रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले, अशा स्पष्ट शब्दात खैरै यांनी दानवे यांच्यावर टीका केलीय. ते औरंगाबाद जिह्ल्यातील सजापूर-करोडी रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप
chandrakant khaire raosaheb danve

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर अनेकवेळा टीका करताना दिसतात. यावेळी मात्र खैरे यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले, असं खैरे यांनी म्हटलंय. ते औरंगाबाद जिल्ह्यातील सजापूर-करोडी रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. (chandrakant khaire alleges raosaheb danve created barrier in construction of jalgaon aurangabad highway)

महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळेच रखडले

चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. “औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळेच रखडले. रावसाहेब दानवे रस्त्याच्या ठेकेदाराला त्रास देत असल्याचं खुद्द नितीन गडकरी यांनी मला सांगितलं. भाजप खासदरच रस्त्याचा ठेकेदार होता. तरीही रावसाहेब दानवे यांनी त्रास दिला,” असा दावा खैरे यांनी केला आहे.

माझ्या पराभवासाठी दानवेंनी पैसे वाटले

शिवसेना तसेच भाजपची युती तुटल्यापासून माजी खासदार चंद्रकांत खैरे दानवे यांच्यावर वेगवेगळे आरोप करताना दिसतात. माझ्या पराभवासाठी दानवे यांनी पैसे वाटल्याचे वक्तव्य यापूर्वी खैरे यांनी केले होते. 12 ऑगस्ट रोजी चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना “लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे. दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता” असे खैरे म्हणाले होते.

कराडांना मीच नगरसेवक केल, मी मोठा नेता

भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर मी मोठा नेता असल्याचं वक्तव्य केलं होतं. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले होते. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला होता.

इतर बातम्या :

महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, भाजपच्या केंद्रीय नेत्याचं मोठं विधान

VIDEO : फरसाण खाताय तर सावधान! कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल

यूपीएससी परीक्षेत बार्टीचा झेंडा, 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या खास शुभेच्छा

(chandrakant khaire alleges raosaheb danve created barrier in construction of jalgaon aurangabad highway)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI