डोंबिवली (कल्याण) : कचर्यातून फरसाणची दहा ते बारा पाकीटे उचलून एक इसम घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान कर्वे रोड परिसरातील ही घटना आहे. ही पाकिटे आपण खाण्यासाठी नेत असल्याचं त्या व्यक्तीचे म्हणणे असले तरी हा व्हिडिओ पाहून फरसाण प्रेमींमध्ये मात्र धडकी भरली आहे.