महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, भाजपच्या केंद्रीय नेत्याचं मोठं विधान

राज्यातील भाजप नेते राज्यात सत्तांतर होणार असल्याचं वारंवार सांगत असतात. आता भाजपच्या केंद्रीय नेत्यानेच राज्यात सत्तांतर होण्याचं सूचक विधान केलं आहे. (maharashtra government will collapse soon, says c t ravi)

महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, भाजपच्या केंद्रीय नेत्याचं मोठं विधान
c t ravi

कल्याण: राज्यातील भाजप नेते राज्यात सत्तांतर होणार असल्याचं वारंवार सांगत असतात. आता भाजपच्या केंद्रीय नेत्यानेच राज्यात सत्तांतर होण्याचं सूचक विधान केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार अधिक काळ टिकणार नाही, असं विधान भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (maharashtra government will collapse soon, says c t ravi)

भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी सी. टी. रवी कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. मात्र तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत असून जास्त दिवस टिकेल असे वाटत नसल्याचे रवी यांनी स्पष्ट केले.

सरकार विरोधात वातावरण

राज्यात आपण जिकडे जिकडे फिरतोय तिकडे महाविकास आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्याचे दिसत आहे. काय काय चूक होत आहे हे लोक बघत आहेत. आता जनताच त्यांचा फैसला करतील असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड, भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते

आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय

दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडीला मोठा इशारा दिला आहे. आमची क्लिअर भूमिका आहे. आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामूळे ओबीसी, मराठा आरक्षण गेलं. आम्हाला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. कोर्टाने 4 मार्चला सांगितलं होतं की राज्य सरकारने डेटा तयार करावा. मात्र सरकारने डेटा तयार केला नाही. हा डेटा सेन्सस डेटा आहे. त्यावेळी मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं यात चुका आहेत. अजित पवारांनी खोटी माहिती दिली. या सरकारला आरक्षण द्यायचं नाही. त्यांना अन्यायच करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री वांद्र्यापूरते अन् मंत्री गावापूरते

शेतकऱ्यांच वीज कनेक्शन कापणं सुरू झालंय. हे सरकार मुघलांसारखे वागत आहे. युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर केली आणि 12 तास आधी रद्द केली, हा सर्वच सावळागोंधळ सुरू आहे, असं ही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री वांद्र्यापूरते आणि मंत्री गावापूरते राहिले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (maharashtra government will collapse soon, says c t ravi)

 

संबंधित बातम्या:

मनमोहन सिंगांऐवजी काँग्रेसनं शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं, महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं?

दिल्लीत जेवणाच्या टेबलवर आजी, माजी आणि भावी, ठाकरे-शहा एकमेकांच्या बाजूला, नेमकं काय शिजलं असेल?

13 वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या, मुलीचा बाप इतका निर्घृणपणे का वागला?

(maharashtra government will collapse soon, says c t ravi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI