AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनमोहन सिंगांऐवजी काँग्रेसनं शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं, महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं?

मनमोहन सिंग यांच्या ऐवजी काँग्रेसने शरद पवार यांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं? यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं आहे. (Sonia Gandhi should have made Pawar PM in 2004 instead of Manmohan if she was unwilling)

मनमोहन सिंगांऐवजी काँग्रेसनं शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं, महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं?
maharashtra leader
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 4:06 PM
Share

मुंबई: मनमोहन सिंग यांच्या ऐवजी काँग्रेसने शरद पवार यांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं? यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं आहे. मनमोहन सिंगांऐवजी पवारांना पंतप्रधान केलं असतं तर काँग्रेसची आज जी दुर्दशा झाली आहे, तेवढी दुर्दशा झाली नसती, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. (Sonia Gandhi should have made Pawar PM in 2004 instead of Manmohan if she was unwilling)

रामदास आठवले काल इंदौरला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हे विधान केलं आहे. 2004 लोकसभा निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळालं होतं. त्यावेळी मी दोन पर्याय सूचवले होते. एक म्हणजे सोनिया गांधींना पंतप्रधान करावं नाही तर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करावं. पवार हे जनाधार असलेले लोकप्रिय नेते आहेत. ते पंतप्रधानपदासाठी योग्य होते. पवारांना पंतप्रधान करावं म्हणून आपण सोनया गांधींकडे आग्रहही धरला होता. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, असा गौप्यस्फोटही आठवेल यांनी केला. तसेच पवारांना पंतप्रधान केलं असतं तर काँग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती, असा दावाही त्यांनी केला.

विदेशीत्वाचा मुद्दाच राहिला नाही

त्यावेळी मी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावं असा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी त्यांच्या विदेशीत्वाचा मुद्दाही राहिलेला नव्हता. पण माझं ऐकलं नाही. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा होऊ शकतात तर सोनिया गांधी का भारताच्या पंतप्रधान होऊ शकत नाही? असा सवाल करतानाच सोनिया गांधी या राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत. लोकसभेच्या सदस्या आहेत. मग त्या पंतप्रधान का होऊ शकत नाही? असं ते म्हणाले.

बसपाला हद्दपार करणार

उत्तर प्रदेशात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालेल्या बसपा नेतृत्वाने दलितांच्या विकासासकडे न्याय हक्कांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसपावरील दलितांचा विश्वास उडाला आहे. बसपाचे दलितांकडे लक्ष नाही. केवळ निवडणुकीत दलित मतांचा केवळ वापर करण्याकडे बसपाचे लक्ष आहे. त्यामुळे बसपा ला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार असल्याचा निर्धार आठवले यांनी व्यक्त केला आहे. बहुजन समाज पक्षाचा जन्म होण्याआधी उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष प्रबळ होता. मात्र उत्तर प्रदेशातून रिपब्लिकन पक्षाला हद्दपार करून बसपाने रिपाइंचे स्थान मिळविले आहे. उत्तर प्रदेशाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत आरपीआयची युतीबाबत बोलणी सुरू आहे. बहुजन कल्याण यात्रेद्वारे उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडविण्यात येणार आहे. त्यानंतर भाजप-रिपाइं युतीचा निर्णय निश्चित होईल. भाजप आरपीआय युती झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपला 300 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असा दावाही त्यांनी केला. (Sonia Gandhi should have made Pawar PM in 2004 instead of Manmohan if she was unwilling)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार टिकेल, शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

दिल्लीत जेवणाच्या टेबलवर आजी, माजी आणि भावी, ठाकरे-शहा एकमेकांच्या बाजूला, नेमकं काय शिजलं असेल?

तुम्ही मोदींजींना विचारलं तर तेही म्हणतील, मैं संजय राऊत के घर के सामने रहता हुँ, वाचा नेमका किस्सा?

(Sonia Gandhi should have made Pawar PM in 2004 instead of Manmohan if she was unwilling)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.