भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलीलही चंद्रकांत खैरेंपेक्षा उजवे आहेत; भाजप आमदाराचा पलटवार

दत्ता कानवटे

| Edited By: |

Updated on: Aug 13, 2021 | 9:07 AM

Prashant Bamb | चंद्रकांत खैरे स्वत:ला भागवतराव कराडांपेक्षा मोठा नेता म्हणवतात. पण खैरे भागवत कराडांची बरोबरी कधीच करु शकत नाहीत. औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळे केल्याची टीका प्रशांत बंब यांनी केली.

भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलीलही चंद्रकांत खैरेंपेक्षा उजवे आहेत; भाजप आमदाराचा पलटवार
प्रशांत बंब आणि चंद्रकांत खैरे

Follow us on

औरंगाबाद: शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची खासदार भागवतराव कराड यांच्याशी बरोबरी करणं सोडाच पण एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलीलही खैरेंपेक्षा चांगले खासदार आहेत, असे वक्तव्य भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केले. चंद्रकांत खैरे हे जळक्या वृत्तीचे आहेत. त्यांनी औरंगाबाद शहराची वाताहात केली, अशी टीकाही प्रशांत बंब यांनी केली.

चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवासाठी भाजप नेत्यांना जबाबदार धरत आगपाखड केली होती. या टीकेला प्रशांत बंब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत खैरे स्वत:ला भागवतराव कराडांपेक्षा मोठा नेता म्हणवतात. पण खैरे भागवत कराडांची बरोबरी कधीच करु शकत नाहीत. औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळे केल्याची टीका प्रशांत बंब यांनी केली. त्यामुळे आता यावर चंद्रकांत खैरे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते?

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला uale.. दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा हल्लाही खैरे यांनी चढवला होता.

कराडांना मीच नगरसेवक केल, मी मोठा नेता

यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

कराडच मला भेटायला येतील

मी दिल्लीत गेलो होतो. पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. ते येतील मला भेटायला. ते मला नेताच मानतात. मी त्यांना खूप सीनियर आहे, असं ते म्हणाले. मला ज्यांनी पाडलं त्या दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात? असा सवालही त्यांनी केला. दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता. त्यांचं काय अभिनंदन करायचं, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या:

VIDEO: दानवेंनी रुग्णालयात बसून पैसे वाटले, माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विधानसभेला विजयाची हॅट्रीक, प्रशांत बंब यांना हे कसं शक्य झालं?; वाचा सविस्तर

शरद पवार म्हणाले, माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही असं पाहिलं नव्हतं, नेमकं काय घडलंय?

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI