AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पोरं घुसवायची, दंगल घडवायची, गोळीबार… फडणवीसांचा मोठा डाव; जरांगे पाटलांच्या आरोपाने खळबळ

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. सणावाराच्या आड मराठा आंदोलनात दंगल घडवून गोळीबार करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता. हा डाव उधळण्यासाठी जरांगे पाटील एकटेच मुंबईला जाणार आहेत, जेणेकरून मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेला जाईल.

मोठी बातमी ! पोरं घुसवायची, दंगल घडवायची, गोळीबार... फडणवीसांचा मोठा डाव; जरांगे पाटलांच्या आरोपाने खळबळ
Manoj JarangeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 1:20 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणावाराच्या आडून मोठा डाव टाकला होता. आपल्या रॅलीत त्यांची पोरं घुसवायची, दंगल घडवायची आणि गोळीबार करायचा हा त्यांचा डावा होता. सणासुदीत मराठ्यांना डाग लावण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक आरोप करतानाच आपल्याला हा डाव उधळून लावायचा आहे. फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आहे. त्यामुळेच मी मुंबईला एकटा जाणार आहे. तुम्ही कुणीही येऊ नका. तुम्ही कधी यायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेन, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. गणपतीच्या आडून फडणवीस यांनी डाव टाकला आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस तोड डाव आपल्याला टाकायचा आहे. मराठे मुंबईत आले तर आपल्या रॅलीत पोरं घुसवायची आणि दंगल भडकावयची हा त्यांचा डाव आहे. म्हणजे त्यांनी आपल्यावर डाव टाकला आहे. मराठ्यांवर दंगलीचा डाग लावण्याचा हा प्रयत्न आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

हा फडणवीस यांचा शेवटचा डाव

पदासाठी मी गद्दार झालो नाही. मी घाबरून जरी शरण आलो तरी माझ्या स्वाभिमानी समाजाला मान खाली घालून जगावं लागेल. मला तुमच्यासाठी कुणासमोर वाकायचं नाही. तुमच्यासाठी मरायचं आहे. पण तुमच्यासाठी शरणागती पत्करणार नाही. म्हणून फडणवीस विरोधात तोडीस तोड डाव टाकत आहे. फडणवीसांचा हा शेवटचा डाव होता. देवदेवतेच्या आडून मराठ्यांचं खच्चीकरण करायचं होतं. मराठ्यांची बदनामी करायची होती. रॅलीत आपलेच लोकं घुसवायचे, दंगल घडवायची आणि गोळीबार करून आंदोलन चिरडून टाकायचा त्यांचा डाव होता, असा आरोपही त्यांनी केला.

आता तरी परवानगी देणार ना?

त्यामुळेच 15 तारखेला मी एकटा मुंबईला जातोय. त्यांनी आपल्याला परवानगी नाकारली ना? आता मला एकट्याला फडणवीस परवानगी देणार की नाही? मराठे मुंबईत आल्यावर अडचणी येतील म्हणत होता, आता मी एकटा आल्यावर तर अडचणी होणार नाही ना? आता आझाद मैदानात परवानगी देणार की नाही? असा सवालच त्यांनी केला.

मिनिटा मिनिटाला…

तुम्ही ज्या गाड्या लावल्या त्या तशाच ठेवा. वर्गणीतील एक रुपयेही खर्च करायचा नाही. गाडीवाल्यांनाही सांगून ठेवा. आरक्षणाचा रथ पुढे नेण्यासाठी डावपेचाने पुढे जावं लागणार आहे. आता देवदेवतेच्या आडून त्यांनी डाव टाकला आहे. आपल्यालाही तसाच डाव टाकायचा आहे. तुम्ही आले तरी आरक्षणाचीच मागणी करणार आहोत. तुम्ही 12 सप्टेंबर रोजी तुमची ताकद दाखवली आहे. तुम्ही काढलेली वर्गणी वाया जाणार नाही. तुम्हाला योग्यवेळी बोलावलं जाईल. तुम्ही सावध राहा आणि सुरक्षित राहा. जागे राहा. मिनिटा मिनिटाला माझ्याकडे आणि मीडियाकडे लक्ष ठेवा. घाई गडबड करू नका. गाड्या आणि पैसे योग्यवेळी योग्य कामाला येणार आहेत. उलट वेळ मिळाला आहे. मुंबईला नेणाऱ्या वाहनांची संख्या वाढवा, असं आवाहन त्यांनी केलं.

गावात रॅली काढा

आता कोर्टात जायची गरज नाही. आझाद मैदानात खूप गर्दी होणार म्हणून कोर्टात गेले होते. आता दहा पाच लोकं घेऊन मी उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे कोर्टात जायची गरज नाही. तुम्ही गावं सांभाळा. मी मुंबईची खिंड लढवतो. हवं तर गावात शांतते रॅली काढा. पाठिंबा म्हणून राज्यभर हे चालू ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार