राज ठाकरे यांच्या स्वागताला आम्ही उत्सुक, शिंदे गटाच्या खासदाराकडून रेडकार्पेट; पडद्यामागे काय घडतंय?

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी फक्त 23 जागा कशाला मागितल्या. त्यांनी 49 जागा मागायला हव्या होत्या. त्यांचा तसा स्वभाव आहे, असा टोला प्रतापराव जाधव यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरही प्रतापराव जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

राज ठाकरे यांच्या स्वागताला आम्ही उत्सुक, शिंदे गटाच्या खासदाराकडून रेडकार्पेट; पडद्यामागे काय घडतंय?
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 1:49 PM

गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 31 डिसेंबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेाट घेतली होती. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरे महायुतीत येण्याबाबतच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अयोध्या दौरा आणि टोलनाक्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट असतानाही महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना युतीत येण्याबाबतची ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यात आता शिंदे गटाच्या एका खासदारनेही भर घातली आहे. या खासदाराने तर राज ठाकरे युतीत आले तर त्यांचं स्वागतच करू असं म्हणत राज यांच्यासाठी रेडकार्पेट अंथरले आहे.

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे एक मोठे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे वक्तृत्व चांगले आहे. त्यांचे संघटनही चांगले आहे. ते जर सोबत येत असतील तर आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांच्या स्वागताला उत्सुक आहोत. पण निर्णय राज ठाकरे काय घ्यायचा तो घेतील, असं मोठं विधान खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीच्या नेत्यांनी अचानक राज ठाकरे यांना महायुतीत येण्याची ऑफर देणारी विधाने सुरू केली आहेत. त्यामुळे पडद्यामागे काही ठरलंय का? अशी चर्चाही होत आहे.

45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसून लोकसभेच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी करतील. जागा वाटपात कोणताही वाद होणार नाही. किंवा कोणाचीही नाराजी होणार नाही. नरेंद्र मोदी याना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणार हेच आमचं सर्वांचं ध्येय आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवून वरिष्ठ नेते मतदारसंघाची वाटणी करतील, असं जाधव म्हणाले.

आग्रह राहील, पण…

मागच्यावेळी आम्ही जेवढ्या जागा लढल्या त्या सर्व लढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्याकडेच पक्ष आणि चिन्हही आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जागांसाठी आग्रही राहू. मागच्यावेळी आम्ही 22 जागा लढल्या होत्या. असं असलं तरी त्यात कमी जास्त होऊ शकतं. कारण तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे जागा वाटप करताना काही गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राऊतांनी 49 जागा मागायला हव्या होत्या

खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी 49 जागा महाराष्ट्रात मागायला पाहिजेत होत्या.त्यांनी 23 का मागितल्या हा प्रश्न आहे. पण त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी 48 पैकी 49 जागा मागायला पाहिजेत हव्या होत्या, असा टोला त्यांनी लगावला. तसेच येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो. लोकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणे, लोकांच्या हिताचे विकासात्मक कामे करणे, हाच पुढील वर्षाचा संकल्प राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....