POCSO: खासगी कोचिंग क्लासमध्ये मुलींसोबत चाळे करणारा शिक्षक अटकेत, औरंगबादेत दामिनी पथकाची धाडसी कारवाई

औरंगाबादेत खासगी कोचिंग क्लास चालवणाऱ्या एका शिक्षकाविरोधात अल्वयीन मुलीने अश्लील चाळे करण्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर शहरातील दामिनी पथकाने तपास करत सदर शिक्षकाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. अशा प्रकारच्या घटनांविरोधात मुलींनी आवाज उठवायला हवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

POCSO: खासगी कोचिंग क्लासमध्ये मुलींसोबत चाळे करणारा शिक्षक अटकेत, औरंगबादेत दामिनी पथकाची धाडसी कारवाई
अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 2:33 PM

औरंगाबादः दहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला दामिनी पथकाने बेड्या ठोकल्या. या मुलीच्या वडिलांनी सदर शिक्षकाविरोधात छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या माहितीवरून दामिनी पथकाने थेट कोचिंग क्लासमध्ये जाऊन संबंधित शिक्षकावर कारवाई केली. अमोल रावसाहेब गवळी असे या शिक्षकाचे नाव आहे. छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिजिक्स शिकवताना अश्लीलतेवरच भर!

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणी 15 वर्षीय मुलीच्या पित्याने दामिनी पथकाला फोन करून क्लासचालक वर्गात कशा प्रकारे छेड काढतो, याबद्दल माहिती दिली. ही धक्कादायक माहिती ऐकून उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव आणि चालक गिरीजा आंधळे यांनी पडेगाव गाठले. त्यांनी आधी मुलीच्या कुटुंबियांना विश्वासात घेतले. कुटुंबियांनी त्यांना आपबिती सांगितले. अमोल गवळी मुलींच्या अंगाला सतत हात लावणे, अश्लील बोलणे, फिजिक्स शिकवताना त्यातील अश्लीलतेवर बोलणे, माझ्यासोबत संबंध ठेवल्यास काही होत नाही, असे सतत बोलत होता. तसेच मोबाइलवर त्याने अश्लील मेसेजदेखील पाठवले होते.

वेश बदलून दामिनी पथक पोहोचले क्लासमध्ये

सदर शिक्षकावर कारवाई करण्यासाठी दामिनी पथक थेट क्लासमध्ये पोहोचले. माझ्या मुलीला शिकवणी लावायची आहे, असा बहाणा करत संपूर्ण माहिती विचारून घेतली आणि त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवत शिक्षकावर कारवाई केली. छावणी पोलिसांची गाडी बोलावून सदर शिक्षकाला ताब्यात घेतले. मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानुसार, सहाय्यक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी मुलीचा जबाब नोंदवला.

मुलींनी तक्रार करण्याची हिंमत दाखवावी!

खासगी कोचिंग क्लासमधल्या शिक्षकाचे हे चाळे गेल्या अनेक महिन्यांपासून चालले होते. मात्र एका मुलीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघड झाला. इतर मुली मात्र या बाबत काहीही बोलायला तयार नाहीत. मुलींनी अशा प्रकरणांमध्ये उघडपणे बोलून तक्रार करण्याची हिंमत दाखवावी, शहर पोलीस मदतीसाठी सदैव तत्पर असतात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इतर बातम्या-

Delhi School News: नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद राहणार, सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा निर्णय

Suresh Mhatre | शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस, पाचव्यांदा पक्षांतर, बाळ्या मामा म्हात्रे आता राष्ट्रवादीत

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.