निवडणुकांमध्ये कत्तल की रात होईल, प्रकाश आंबेडकर यांचं धक्कादायक विधान; का केलं असं विधान?

| Updated on: Sep 29, 2023 | 1:48 PM

स्थानिक उद्योजकांपेक्षा बाहेरच्या उद्योजकांना जमिनी दिल्या आहेत. राजकर्ते हे व्यापारी झाले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

निवडणुकांमध्ये कत्तल की रात होईल, प्रकाश आंबेडकर यांचं धक्कादायक विधान; का केलं असं विधान?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 29 सप्टेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाचीही जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. ही चर्चा कधी सुरू होईल याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी आतापासूनच मतदारसंघांच्या बांधणीकडे लक्ष दिलं आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा आणि विधानसबा निवडणुकीत का होऊ शकतं याबाबतचं भाकीतही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे.

आगामी निवडणुकीत कत्तल की रात होईल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला, स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मतदान होईपर्यंत शांत रहा. सनातनच्या प्रचाराला बळी पडू नका असे भारतीयाला आवाहन आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

कब है दिवाली म्हणायची वेळ

आरक्षण आंदोलने स्फोटक होत आहेत. कब है दिवाली अशी म्हणायची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले. आम्ही निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. आमच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रात वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

अकोल्यातून लढणार

वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. एमआयएम सोबत युती करण्याच्या आधीपासूनच मुस्लिम माझ्या सोबत होते, असंही त्यांनी सांगितलं.

20 इंचाची छाती होईल

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. परदेशी लोक आपल्याकडे टेररिस्टच्या नजरेने पाहत आहेत. त्यावर मोदींनी बोललं पाहिजे. त्यांनी भारतीय नागरिकांना संबोधित केलं पाहिजे. एक कंगाल देश आपल्यावर गोळीबार करतो. आपण त्यावर काहीच करत नाही. फक्त पाहत राहतो. इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे 4 ते 5 तुकडे केले असते, असं सांगतानाच मोदींची 56 इंचाची छाती 24 इंचाची झाली. निवडणुकांपर्यंत ती 20 इंचाची होईल, असा टोला त्यांनी लगावला.