Raj Thackeray: आणि राज ठाकरेंचं भाषण ऐन भरात असताना अजानचा भोंगा वाजला, पुढं काय झालं ते ऐका, वाचा

Raj Thackeray: सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. आताच्या जाऊन हे पहिल्यांदा बंद करा.

Raj Thackeray: आणि राज ठाकरेंचं भाषण ऐन भरात असताना अजानचा भोंगा वाजला, पुढं काय झालं ते ऐका, वाचा
आणि राज ठाकरेंचं भाषण ऐन भरात असताना अजानचा भोंगा वाजला, पुढं काय झालं ते ऐका, वाचाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 9:23 PM

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. उत्तर प्रदेशात (uttar pradesh) भोंगे उतरवले जातात. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली. त्यामुळे राज ठाकरे थोडे थांबले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना (police) अजान बंद करण्याची विनंती केली. आताच्या आता जाऊन तात्काळ अजान बंद करा. त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ भाषेत कळत नसेल तर काय ते होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. आणि पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारला धारेवर धरलं.

सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. आताच्या जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ देत. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजी नगर पोलिसांना हात जोडून विनंती करतो. परत सांगतोय. ऐकत नसतील तर महाराष्ट्रातील मनगटात काय ताकद आहे हे दाखवू. देशवासियांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. भोंगे उतरलेच पाहिजे. सर्व धर्मीयांच्या स्थळांवरचे भोंगे उतरलेच पाहिजे. पण आधी मशिदीवरचे नंतर मंदिरावरचे. अभी नही तो कभी नही. हवं तर पोलिसांची परवानगी घ्या. त्यांना परवानगी द्यावीच लागते. परवानगी घेऊन जोरात हनुमान चालिसाचं पठण कराल. हा सामाजिकदृष्टया प्रलंबित प्रश्न मार्गी लावा. हातभार लावाल. ही विनंती करतो, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

दंगली घडवायची माझी इच्छा नाही

लाऊडस्पीकरचा अनेकांनी विषय मांडला. मी फक्त त्याला पर्याय दिला. मशिदीवर लाऊडस्पीकर लावणार असाल तर आम्ही मशिदीबाहेर हनुमान चालिसा पठण करू. मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. माझी इच्छाही नाही. मुस्लिम समाजानेही ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. नाशिकला एक पत्रकार आले. मुस्लिम समाजातील होते. म्हणाले, मी मुसलमान आहे. आम्हाला भोंग्याचा त्रास होतो. माझं लहान मुल लाऊडस्पीकरमुळे झोपेना. ते आजारी पडायला लागलं. झोप लागली तर अजान सुरू होते. मी मौलवींना सांगितलं मुलाला त्रास होतो. तुम्ही मशिदीतच्या आत काय ते करा. त्यानंतर त्याने कमी केलं, असं राज ठाकरे म्हणाले.

यूपीत भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही?

लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. तो धार्मिक विषय नाही. त्याला धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्माने द्यावं लागेल. एवढं लक्षात ठेवावं. इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रातील शांतता बिघडवायची नाही. उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही?, असा सवाल त्यांनी केला.

रस्त्यावर नमाज पठणाचा अधिकार कुणी दिला?

सर्व लाऊडस्पीकर अनाधिकृत आहेत. पोलिसांना विचारल्याशवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. कोर्टाने सांगितलं. किती मशिदींकडे परवानगी आहे? कुणाकडेच नाही. मला कोणी तरी सांगितलं. संभाजीनगरात 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे, अख्ख्या देशभर हेच आहे. संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली यावे. सर्वांना समान धर्म असला पाहिजे. आम्हाला सभा घेतना हा सायलन्स झोन आहे, असं सांगितलं जातं. शाळा आहे. रात्री कुठे शाळा असेत? यांना कुठेही. रस्त्यावर उतरून नमाज पढतात. कुणी अधिकार दिला? शासनाला विनंती. आज तारीख 1, उद्या तारीख 2, 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही. हिंदूंना हातजोडून विनंती आहे. जिथे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट हनुमान चालिसा लागला पाहिजे. विनंती करून ऐकत नसेल तर पर्याय नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.