औरंगाबादमध्ये ठाकरे-शिंदे गटाच्या नेत्यांची टोलेबाजी; चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना दिल्या यासाठी शुभेच्छा

दत्ता कानवटे

| Edited By: |

Updated on: Jan 26, 2023 | 4:30 PM

चंद्रकांत खैरे म्हणाले, अंबादास दानवे यांना जवळ बसायला सांगितलं होतं. पण, ते तिकडं बसले. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. आम्ही आपलं...

औरंगाबादमध्ये ठाकरे-शिंदे गटाच्या नेत्यांची टोलेबाजी; चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना दिल्या यासाठी शुभेच्छा
चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट

औरंगाबाद : येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राजकीय नेत्यांची टोलेबाजी पाहायला मिळाली. ठाकरे-शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलीच टोलेबाजी केली. शिंदे गटाचे संजय शिरसाट मंत्री झाले, तर त्यांना शुभेच्छा असं ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे म्हणाले. चंद्रकांत खैरे आणि मी एकत्र सेना वाढविली, असं शिरसाट यांनी म्हंटलंय. औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शिंदे-ठाकरे गटाने नेते एकत्र व्हीआयपी चेअरवर आजूबाजूला बसले होते. इम्तीयाज जलील, संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे जवळजवळ बसले होते. यावेळी त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली.

अंबादास दानवे म्हणाले, प्रजासत्ताक दिन असल्यानं रांग, राजकारण असल्याचं कारण नाही. प्रजासत्ताक दिन हा देशाच्या दृष्टीने मोठा दिवस असतो. पण, प्रजेची सत्ता येणं बाकी असल्याचं खंतही त्यांनी बोलून दाखविली. हा दिवस महत्त्वाचा असल्यानं आम्ही ध्वजारोहणाला आलो असल्याचं दानवे यांनी म्हंटलं.

शिरसाट आणि खैरे यांच्यात नव्हते अंतर

एकीकडं चंद्रकांत खैरे बसले होते. त्यांच्या बाजूला संजय शिरसाट बसले होते. तर, दुसरीकडं अंबादास दानवे बसले होते. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये अंतर होते. पण, संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकाच सोफ्यावर बसले होते. शिरसाट आणि खैरे यांच्यात अंतर नव्हते. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, आम्ही सर्व खैरे साहेबांच्या नेतृत्वात काम करत होता.

चंद्रकांत खैरे म्हणाले, अंबादास दानवे यांना जवळ बसायला सांगितलं होतं. पण, ते तिकडं बसले. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. आम्ही आपलं…

मी काही एमआयएमचा झालो का?

संजय शिरसाट यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे म्हणाले, संजय शिरसाट यांना मी जवळ बसवून घेतले नाही. मी आधी बसलो होते. नंतर संजय शिरसाट येथून बसले.

संजय शिरसाट यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, जवळ बसलो. या व्हीआयपी चेअर आहेत. खैरे हेसुद्धा व्हीआयपी आहेत. याच चुकीचं काहीच नाही. माझ्या बाजूला खासदार इम्तियाज जलील बसले. याचा अर्थ मी काही एमआयएमचा झालो का? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पक्षपात नसतो. जे ज्येष्ठ असतात त्यांचा आदर करावा लागतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI