छत्रपतींचा बहुचर्चित, देशातील सर्वोच्च अश्वारुढ पुतळा 15 जानेवारीपर्यंत येणार, औरंगाबादकरांची उत्सुकता शिगेला!

शहरातील मध्यवर्ती क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांचा सर्वोच्च असा अश्वारूढ पुतळा 15 जानेवारीपर्यंत शहरात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली

छत्रपतींचा बहुचर्चित, देशातील सर्वोच्च अश्वारुढ पुतळा 15 जानेवारीपर्यंत येणार, औरंगाबादकरांची उत्सुकता शिगेला!
पुण्यातील स्टुडिओत काम सुरु असलेल्या शिवाजी पुतळ्याचे काही दिवसांपूर्वीचे छायाचित्र व दुसऱ्या छायाचित्रात सध्याची तयारी

औरंगाबादः शहरातील मध्यवर्ती क्रांती चौकातील (Kranti chauk) छत्रपती शिवरायांचा सर्वोच्च असा अश्वारूढ पुतळा (Highest Shivaji Maharaj Statue) 15 जानेवारीपर्यंत शहरात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून शिवाजी महाराजांचा पुतळा कधी येतोय, ही उत्सुकता औरंगाबादकरांना लागली होती. पुतळ्याभोवतालच्या चौथऱ्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. 21 फूट उंचीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उच्च अश्वारुढ पुतळा असून पुण्यातील धायरीच्या थोपटे स्टुडिओमध्ये त्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरु आहे.

देशातील सर्वोच्च पुतळा

क्रांती चौकात 15 जानेवारी रोजी येऊ घातलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याची उंची 21 फुट असून त्याची लांबी 22 फूट एवढी असेल. चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 52 फूट असेल. हा पुतळा 6 टन वजनाचा असेल. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक उंचीचा शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा ठरेल. या पुतळ्यासाठी अंदाजे 2.82 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

जुन्या पुतळ्याचा इतिहास काय?

औरंगाबादमधील क्रांती चौकात सर्वप्रथम 38 वर्षांपूर्वी 1983 च्या काळात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्या पुतळ्यासाठीही शहरवासियांनी 21 वर्षे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे नगराध्यक्ष अलफखाँ यांच्या अध्यक्षतेखाली अश्वारुढ शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची यासाठी स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या वतीने तो उभारण्यात आला होता. स्थापनेनंतर शहरातील असंख्य स्थित्यंतरे या पुतळ्याने पाहिली. औरंगाबादच्या विकासकामांमध्ये क्रांतिचौकातील उड्डाणपूलही झाला. या पुलासमोर जुन्हा पुतळ्याची उंची कमी भासू लागली. त्यामुळे पुलाच्या वर दिसेल असा पुतळा उभारण्याची मागणी जोर धरू लागली आणि नवीन पुतळ्याचे काम सुरु झाले.

इतर बातम्या

Sanjay Raut On Election Commission | ‘निवडणूक आयोगानं कोणाच्याही दबावाखाली काम करू नये’

5 State Elections 2022: जाणून घ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI