AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gold: खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याचे दर 400 रुपयांनी घटले, जाणून घ्या औरंगाबाद सराफा बाजारातील दर

गुरुवारी सोन्याच्या दरात आणखी 400 रुपयांची घसरण पहायला मिळाली. गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 46,800 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास नोंदले गेले. काल हे दर 47,200 रुपये प्रति तोळा एवढे होते.

Aurangabad Gold: खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याचे दर  400 रुपयांनी घटले, जाणून घ्या औरंगाबाद सराफा बाजारातील दर
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 2:19 PM
Share

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक(Investment in Gold) करायची की नाही, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहेत. परिणामी सराफा बाजारातही फार हालचाल दिसून येत नाही. औरंगाबादच्या सराफा बाजारात (Aurangabad Sarafa Bajar) गुरुवारी सोन्याच्या दरात आणखी 400 रुपयांची घसरण पहायला मिळाली. गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 46,800 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास नोंदले गेले. काल हे दर 47,200 रुपये प्रति तोळा एवढे होते. त्यामुळे या आठवड्यात सोन्याच्या दरातील घसरणीची मालिका सुरूच आहे, असे म्हणता येईल. म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार असेल, तर हीच संधी आहे. कारण दिवाळीदरम्यान सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चांदीचे भावही जैसे थे…

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही फार हालचाल नाही. औरंगाबादमध्ये आज चांदीचे दर 67,000 रुपये प्रति किलो असे आहेत. कालही चांदीचे हेच दर होते. देशातील विविध शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आढळत असते. तसेच शेअर-मार्केटमधील तेजी-मंदीचा प्रभावही सोने-चांदीच्या दरांवर होत असतो. गोल्ड रिटर्न्स या हिंदी वेबसाईटनुसार, आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 46,380 रुपये प्रति तोळा, पुण्यातले दर 45,590 रुपये प्रति तोळा, नागपूरमध्ये 46,380 रुपये प्रति तोळा, नवी दिल्लीतील दर 46450 रुपये प्रति तोळा तर हैदराबादमधील दर 44,200 रुपये प्रति तोळा एवढे आहेत.

एमसीएक्सवर किती दरावर सोन्याचा व्यापार?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात तेजी आहे. सोन्यात ऑक्टोबरच्या फ्यूचर ट्रेडमध्ये 4 रुपयांची तेजी असून तो 47,072.00 रुपयांच्या स्तरावर आहे. तर सप्टेंबरमधील चांदीच्या फ्यूचर ट्रेडमध्ये 21.00 रुपयांची घसरण पहायला मिळाली. हा दर 63,552.00 असा नोंदवला गेला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात तेजी दिसतेय. गोल्ड रिटर्न्स या हिंदी वेबसाइटवरील माहितीनुसार, अमेरिकेत सोन्याचे दर 1.05 डॉलरने वाढले. सोन्यात 1,814.32 डॉलर प्रति औसांवर ट्रेडिंग सुरू आहे. तर चांदीच्या व्यापारातही 0.01डॉलरच्या तेजीसह 24.17 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यापार सुरू आहे.

क्रिप्टो करन्सीला मात्र सुसाट वेग 

क्रिप्टो करन्सीची आजकाल खूप चर्चा आहे. हा श्रीमंत बनण्यासाठीचा सोपा मार्ग समजला जात आहे. बिटकॉइन क्रिप्टो करन्सीचा सध्याचा कॉइन डेस्कवरील दर 49,614 डॉलर एवढा सुरू आहे. सध्या त्यात 5.53 टक्क्यांची वृद्धी दिसून येत आहे. या दरावर बिटकॉइन क्रिप्टो करन्सीचे मार्केट कॅप 932.94 अब्ज डॉलर एवढे आहे. एका वर्षात बिटकॉइन 71% रिटर्न देते, अशी नोंद आहे.

इतर बातम्या: 

Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले, पटापट तपासा

अबब! 2000 रुपयांचा वडापाव; सोन्याचा वर्ख, चीज स्टफिंग, सारा थाटच न्यारा

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.