AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gold: सोने-चांदी पुन्हा घसरले, सणासुदीत खरेदीची संधी, जाणून घ्या औरंगाबाद शहरातील भाव

सोमवारी सोने आणि चांदी या दोहोंच्या दरात चांगलीच वाढ झालेली दिसून आली होती. चांदीने तर मोठी वृद्धी दर्शवली होती. मात्र मंगळवारी दोन्हींच्या दरात काहीशी घसरण दिसली. तसेच बुधवारी तर चांदीने चांगलीच लोळण घेतली. त्यामुळे सोने-चांदीच्या दरांच्या ट्रेंडचा नेमका माग कसा काढायचा हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.

Aurangabad Gold: सोने-चांदी पुन्हा घसरले, सणासुदीत खरेदीची संधी, जाणून घ्या औरंगाबाद शहरातील भाव
संग्रहित छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 08, 2021 | 8:55 PM
Share

औरंगाबाद: आठवड्याच्या सुरुवातीला तेजीत असलेले सोन्या-चांदीचे भाव पुन्हा एकदा घसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणपती-गौरींच्या दिवसात सोने महागते की काय, या चिंतेत असलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीने चांगलीच घसरण अनुभवली आहे. औरंगाबादमध्ये (Gold rate in Aurangabad, Maharashtra) सोन्याने तर 47 हजार रुपयांचीही पातळी ओलांडून घसरण घेतली आहे. तर सोमवारी चांगलीच तेजी दर्शवलेल्या चांदीनेही मोठी घट घेतली.

शहरातील सोन्या-चांदीचे भाव

बुधवारी दिनांक 08 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 46,900 रुपये प्रति तोळा एवढे होते. सोमवारी हे दर 47,500 रुपये प्रति तोळा होते. मात्र दोनच दिवसात सोन्याने 600 रुपयांपेक्षा जास्त घसरण घेतली. सोन्याचे हे दर 22 कॅरेट प्रकारातील असून आता येत्या काळात दरांचा आलेख चढा असेल की उतरणीच्या दिशेनेच असेल, याबाबत ग्राहकांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान चांदीच्या भावातही प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. औरंगाबादमध्ये चांदीचे दर 66500 रुपये प्रति किलोवर आहेत. सोमवारी चांदीच्या दरांनी प्रचंड उसळी घेतली होती. आठवड्याच्या सुरुवातीला हे दर -3000 ते 3500 हजार रुपयांनी वाढलेले होते. मात्र शेअर-बाजारातील हालचालींमुळे चांदीचे दर घसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

आठवड्याच्या तीन दिवसांत प्रचंड चढ-उतार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कमोडिटी मार्केटमध्येही प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे मार्केटमधील सोन्या-चांदीच्या दरातही कमालीचा चढ-उतार दिसून येत आहे. अगदी आठवड्यातील तीन दिवसातही ही अस्थिरता अनुभवता येईल. सोमवारी सोने आणि चांदी या दोहोंच्या दरात चांगलीच वाढ झालेली दिसून आली होती. चांदीने तर मोठी वृद्धी दर्शवली होती. मात्र मंगळवारी दोन्हींच्या दरात काहीशी घसरण दिसली. तसेच बुधवारी तर चांदीने चांगलीच लोळण घेतली. त्यामुळे सोने-चांदीच्या दरांच्या ट्रेंडचा नेमका माग कसा काढायचा हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते. भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो. (Today’s gold and silver rate in Aurangabad sarafa market, Maharashtra)

इतर बातम्या- 

Gold-Silver Rate : सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या किती महाग झालं 10 ग्रॅम सोनं?

पुण्यात माजी आमदाराच्या पुतण्याच्या घरी चोरी, 100 तोळे सोन्यासह लाखोंची लूट

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला