Gold Rate Today : सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, वाचा सोन्याचे ताजे दर

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या सेंट्रल बँकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे मोठे विधान केलेय. यानंतर असे मानले जाते की, सध्या अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता नाही. म्हणूनच किमतींवर दबाव आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात.

Gold Rate Today : सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, वाचा सोन्याचे ताजे दर
Gold Silver Price

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव खाली आलेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 199 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवण्यात आली. एक किलो चांदीची किंमत 250 रुपयांपर्यंत खाली आली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या सेंट्रल बँकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे मोठे विधान केलेय. यानंतर असे मानले जाते की, सध्या अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता नाही. म्हणूनच किमतींवर दबाव आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात.

सोन्याची नवी किंमत (Gold Price, 30 August 2021)

राजधानी दिल्लीत आज 99.9 टक्के सोन्याचा भाव 199 रुपयांनी घसरून 46,389 रुपयांवर आला. याआधी शुक्रवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर ते 46,588 वर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत $ 1,814 प्रति औंस होती.

चांदीची नवी किंमत (Silver Price, 30 August 2021)

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 250 रुपयांनी घसरून 62,063 रुपये प्रति किलो झाली. याआधी गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदीची किंमत 62,313 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत 23.99 डॉलर प्रति औंस होती.

सोने खरे आहे की बनावट कसे ओळखावे?

(1) हॉलमार्किंग करून अस्सल सोने ओळखणे सर्वात सोपे आहे. भारतात BIS संस्था ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या दागिन्यांची गुणवत्ता पातळी तपासते. त्यामुळे BIS हॉलमार्क पाहून सोने खरेदी करा. हॉलमार्क मूळ आहे की नाही हे पाहणे देखील आवश्यक आहे? मूळ हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह आहे आणि त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धता देखील लिहिलेली आहे.
(2) घरगुती उपायांद्वारे तुम्ही सोने ओळखू शकता. यासाठी तुम्हाला बादलीत पाणी घ्यावे लागेल. त्यात सोन्याचे दागिने घाला, जर दागिने बुडले तर समजावे की सोने खरे आहे. जर ते काही काळ तरंगत असेल, तर सोने बनावट असल्याचं समजून जा. किंबहुना सोने कितीही हलके असले तरी ते अस्सल असल्यास पाण्यात बुडते.
(3) व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही सोने ओळखू शकता. सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे काही थेंब घाला, जर त्याच्या रंगात काही बदल झाला नाही तर ते खरे सोने आहे. त्याच वेळी, जर त्याचा रंग बदलला तर ते बनावट आहे.
(4) जर तुम्हाला वास्तविक सोन्याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या अॅसिड चाचणीद्वारे सहज शोधू शकता, यासाठी तुम्हाला पिनने सोन्यावर थोडा स्क्रॅच करावा लागेल आणि नंतर त्या स्क्रॅचवर नायट्रिक अॅसिडचा एक थेंब टाका. बनावट सोने ताबडतोब हिरवे होईल, तर वास्तविक सोन्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
(5) वास्तविक सोने ओळखण्यासाठी तुम्ही चुंबक चाचणी देखील करू शकता. सोने चुंबकाला चिकटत नाही, म्हणून एक मजबूत चुंबक घ्या आणि त्याबरोबर सोने चिकटवा. जर सोने चुंबकाकडे थोडेसे आकर्षित झाले, तर याचा अर्थ असा की, सोने अस्सल आहे. म्हणूनच चुंबकाद्वारे तपासणी केल्यानंतरच सोने खरेदी करा. प्राचीन आणि व्हिक्टोरियन नाणी गोल आणि घासलेली असतात, तर बनावट नाण्यांच्या बाजूंना कडा असतात.

संबंधित बातम्या

रेनबॅक्सी सिंह बंधूंच्या जामिनाच्या नावाखाली त्यांच्या पत्नींची 204 कोटींची फसवणूक

Post Office मध्ये FD करा, तुम्हाला एका वर्षात बँकेपेक्षा अधिक लाभ, किती व्याज मिळणार?

Gold Rate Today: A golden opportunity to buy gold cheaply, read the latest gold prices

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI