Aurangabad| शहराचा पाणीपुरवठा आज विस्कळीत, ट्रान्सफॉर्मर जोडणीसाठी शनिवारी चार तासांचा शटडाऊन!

Aurangabad| शहराचा पाणीपुरवठा आज विस्कळीत,  ट्रान्सफॉर्मर जोडणीसाठी शनिवारी चार तासांचा शटडाऊन!
ठाणे शहरातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार

फारोळा येथील नव्या ट्रान्सफॉर्मरच्या जोडणीचे काम शनिवारी सकाळी सुरु केले जाईल. हे दुरुस्तीचे काम  सकाळी दहा वाजेपासून सुरु होईल. यापुढील चार तास नवीन जलयोजनेवर शटडाऊन घेतला जाणार आहे. या कालावधीत नवीन जलयोजनेचा पाणी उपसा पूर्णतः बंद राहणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 29, 2022 | 7:00 AM

औरंगाबादः फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील उपकेंद्रात नवीन ट्रान्सफॉर्मरच्या (New Transformer) जोडणीच्या कामासाठी शनिवारी 29 जानेवारी रोजी पाणीपुरवठा (Aurangabad water supply) वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. शहराच्या (Aurangabad city) शंभर एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनेवर चार तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. या काळात पाणी उपसा पूर्णपणे बंद राहणार असल्याने शहराचा पुरवठा विस्कळीत होईल. नागरिकांनी बदललेल्या वेळेनुसार नियोजन करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

फारोळ्यात नवे ट्रान्सफॉर्मर

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी याविषयीची माहिती दिली. शहराला जायकवाडी धरणातून 56 एमएलडी व 100 एमएलडी क्षमतेच्या दोन योजनांतून पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहे. त्यामुळे फारोफा पंपगृहातील विद्युत उपकेंद्रात शंभर एमएलडी क्षमतेच्या योजनेसाठी 1600 केव्ही क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहे. या ट्रान्सफॉर्मवरची 29 जानेवारी रोजी जोडणी करून चाचणी घेतली जाणार आहे.

चार तासांचा शटडाऊन

फारोळा येथील नव्या ट्रान्सफॉर्मरच्या जोडणीचे काम शनिवारी सकाळी सुरु केले जाईल. हे दुरुस्तीचे काम  सकाळी दहा वाजेपासून सुरु होईल. यापुढील चार तास नवीन जलयोजनेवर शटडाऊन घेतला जाणार आहे. या कालावधीत नवीन जलयोजनेचा पाणी उपसा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

इतर बातम्या-

Pravin Darekar | ‘राज्य सरकारच्या मुजोरीला सुप्रीम कोर्टाची चपराक, शेवटी सत्याचाच विजय झाला’

कृत्रिम बहुमताने मिळालेली सत्ता आघाडीच्या डोक्यात गेल्याने हम करे सो कायदा वागत होते-चंद्रकांत पाटील

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें