औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वात उंच कारंजे, माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून सुशोभन

औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वात उंच कारंजे, माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून सुशोभन
औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील सुशोभित कारंजे

माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून सुशोभित करण्यात आलेले हे कारंजे आणि मानस्तंभाचे उद्घाटन उद्योजक सुभाष सारडा, माजी अध्यक्ष राम भोगले, व्यवस्थापन परीषदेचे माजी अध्यक्ष उद्योजक विवेक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

मंजिरी धर्माधिकारी

|

Jan 28, 2022 | 3:37 PM

औरंगाबादः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Aurangabad government engineering collage ) मुख्य इमारतीसमोरील उंच कारंजे आणि मानस्तंभाचे सुशोभन नुकतेच करण्यात आले. शहरातील हे सर्वात उंच कारंजे असून त्याचे सुशोभिकरण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून साकारण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला त्याचे उद्घाटन उद्योजक सुभाष सारडा (Subhash Sarda), माजी अध्यक्ष राम भोगले (Ram Bhogle), व्यवस्थापन परीषदेचे माजी अध्यक्ष उद्योजक विवेक भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उमेश कहाळेकर हे होते. यावेळी यु UPSC मध्ये उत्तीर्ण झालेला शुभम नागरगोजे या कॉलेजच्या विद्यार्थ्याचा सत्कार राम भोगले सरांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातले सर्वात उंच कारंजे

मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणीच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. पहिल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना 1960 मध्ये झाली होती. हे महाविद्यालय ज्या इमारतींमध्ये सुरु झाले, ती इमारत पॉलिटेक्निक महाविद्यालयासाठी बांधण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी इमारतीत पुरेशा सोयी सुविधा नव्हत्या. त्यानंतर मात्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेत बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहराच्या विकासातही तेवढेच योगदान दिले.
नुकतेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला येथील कारंजे आणि इमारतीवरील मानस्तंभाचे सुशोभिकरण करण्यात आले. शैक्षणिक इमारतींवरील सर्वात उंच असा हा स्तंभ आहे. तसेच हे कारंजेदेखील 10 मीटर उंचीचे असून शहरातील सर्वात उंच कारंजे आहे. यावेळी कायमस्वरुपी रोषणाई देखील करण्यात आली आहे.

उद्योजक सुभाष सारडा, माजी अध्यक्ष राम भोगलेंच्या हस्ते उद्याटन

माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून सुशोभित करण्यात आलेले हे कारंजे आणि मानस्तंभाचे उद्घाटन उद्योजक सुभाष सारडा, माजी अध्यक्ष राम भोगले, व्यवस्थापन परीषदेचे माजी अध्यक्ष उद्योजक विवेक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेचे कोषाध्यक्ष सुधीर बोंडेकर, उपाध्यक्ष सुधीर शिरडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यकारिणी सभासद सुरेंद्र पाटील, किरण यंबल, माहिती अधिकारी मकरंद राजेंद्र, प्रा. डॉ. संजय शिंदे, प्रा. कुशल वासनकर, विद्यार्थी प्रतिनिधी हे या प्रसंगी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नितीन सोमाणी यांनी सर्वांचे आभार मानले. सचिव श्रीकांत उमरीकर यांनी सुत्रसंचालन केले.

इतर बातम्या-

‘रणजी’च्या आयोजनावरुन शास्त्री गुरुजींचे बीसीसीआयला खडे बोल, म्हणाले, दुर्लक्ष केल्यास…

सुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें