सुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली

सुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली

देशाचे सुवर्णतीर्थ असलेल्या जळगावमध्ये सोन्यात मोठी घसरण दिसून आली. सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी झाले तर चांदी 2200 रुपयांनी गडगडली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 28, 2022 | 2:58 PM

सुवर्ण नगरी जळगाव (Golden City Jalgaon) मध्ये सोन्याची (Gold) चकाकी फिकी पडली. तर चांदीची(Silver) चमक कमी झाली आहे. अचानक सोन्याने कोरोना  काळात रेकॉर्ड तोड भाव वाढ नोंदवली आहे. त्यामुळे सोन्यात पुर्वीपासून गुंतवणूक करणारे मालामाल झाले. गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे सोन्याच्या भावात तब्बल 900 रुपयांची घसरण होवून 48 हजार 300 रुपये प्रति तोळा झाला आहे तर चांदीच्या भावात 2 हजार ते 2200 रुपये घसरण होवून चांदीचा भाव 63 हजार 600 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. 10 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,560 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चादीचे दर 62,030 रुपये असा होता. 12 जानेवारी 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,570 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो चांदीचे दर 62,090 रुपये इतका नोंदविला गेला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात सलग भावात सलग पडझड दिसून येत आहे. सोने (Gold Rate) दरात 900 रुपयांची घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) देखील 2200 रुपयांनी तुटली. यापूर्वी 18 जानेवारी रोजी जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,040 इतका होता. तर चांदीचा प्रति किलोचा भाव 63,350 रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

यापूर्वी च्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

10 जानेवारी (सोमवार) रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,560 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चादीचे दर 62,030 रुपये असा होता. 11 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,570 रुपये प्रति तोळा एवढे होते. तर एक किलो चांदीचे दर 62,090 रुपये इतका नोंदविला गेला. 12 जानेवारी 24 कॅरेट सोन्याचे 48,810 रुपये प्रति तोळा एवढे होते. तर एक किलो चांदीचे दर 62,4540 रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,930 रुपयावर होते. तर चांदीचा प्रति किलोचा भाव 63,310 रुपये इतका होता.

सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

संबंधित बातम्या : 
Air India : एअर इंडिया टेकओव्हरनंतर टाटा ग्रुपचे पहिले ट्विट, वाचा सविस्तर

Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें