पोरांनो आईची काळजी घ्या, कर्जाचे पैसे देऊन येतो म्हणाला बाप, अन् परत आलाच नाही, औरंगाबादेत शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ!

पोरांनो आईची काळजी घ्या, कर्जाचे पैसे देऊन येतो म्हणाला बाप, अन् परत आलाच नाही, औरंगाबादेत शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ!
मृत शेतकरी पंडितराव कळंब

डोक्याला गंभीर मार लागला असल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. मंगळवारी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या. परंतु बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मंजिरी धर्माधिकारी

|

Jan 28, 2022 | 12:54 PM

औरंगाबादः पोरांनो तुमच्या आईची काळजी घ्या, मी कर्ज घेतलेले पैसे जमा करून घरी योतच, असं सांगून घरातून निघालेला बाप दोन दिवस झाले तरी आला नाही. तिसऱ्या दिवशी विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याचे कळल्याने शेतकरी (Aurangabad farmer) कुटुंबावर आभाळच कोसळलं. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री (Fulambri) तालुक्यातील रांजणगाव येथील ही घटना आहे. घरातील एकमेव कर्त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असतानाही कर्जाचे पैसे चुकवण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे (Farmer Death) संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

कुटुंबावर कर्जाचा बोजा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडितराव सीताराम कळंब असे मृताचे नाव आहे. ते भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील रहिवासी आहेत. कशी बशी गुजराण होईल, एवढी शेतीही मालकीची नसल्याने पंडितराव मजुरी करत असत. या मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. 2019 मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यावेळी कर्जाचा बोजा वाढला होता. त्यामुळे मोलमजुरी करून उसने पैसे फेडणे सुरु होते. मागील वर्षभरापासून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात विहिरीवर काम करण्यासाठी जात होते. त्या ठिकाणी एका ठेकेदाराकडे ते कामाला होते.

काय घडली घटना?

विहिरीवर काम करण्यासाठी गेलेले पंडितराव घसरून विहिरीत पडले. त्यांना लगेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागला असल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. मंगळवारी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या. परंतु बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. रात्री साडेनऊ वाजता वडोद तांगडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

इतर बातम्या-

VIDEO : ‘सत्य परेशान हो सकता है,पराजीत नही हो सकता’, Ashish Shelarसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया

Gangubai Kathiyawadi : आलिया भटच्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी सिनेमा प्रदर्शित होणार

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें