सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार काय?, अशोक चव्हाण म्हणतात, तो निर्णय…

| Updated on: Jan 14, 2023 | 7:18 PM

सत्यजित तांबे किंवा त्याचे वडील दोघांपैकी कोणीही लढला असता तरी चाललं असतं. पण, ज्या परिस्थितीत हे घडलं त्याची इतंभूत माहिती बाळासाहेब थोरात यांना असू शकते. त्यांच्याच घरातला विषय आहे.

सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार काय?, अशोक चव्हाण म्हणतात, तो निर्णय...
अशोक चव्हाण
Follow us on

औरंगाबाद : नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष फार्म भरला. त्यांच्यावर कारवाई होणार का, यावर बोलताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, यावर मी काही भाष्य करू शकत नाही. शेवटी हा निर्णय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. तांबे यांना कोरे एबी फार्म देण्यात आले होते. तरीही त्यांनी भरले नाहीत. यात काँग्रेसचे लक्ष नव्हते. हीच गंभीर बाब आहे. वर्तमानपत्रात वाचलं आणि मीडियात पाहिलं त्यातून असं दिसत की, कोरा एबी फार्म दिल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, सत्यजित तांबे किंवा त्याचे वडील दोघांपैकी कोणीही लढला असता तरी चाललं असतं. पण, ज्या परिस्थितीत हे घडलं त्याची इतंभूत माहिती बाळासाहेब थोरात यांना असू शकते. त्यांच्याच घरातला विषय आहे.

तिन्ही पक्ष मिळून ठरवतील

शुभांगी पाटील या मातोश्रीवर गेल्या आहेत. शिवसेना त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले. तिन्ही पक्षांचा समन्वय आहे. तिन्ही मिळून ठरेल. त्याप्रमाणे निर्णय होईल.

संवादाचा प्रश्न होताच कुठं

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत संवाद नव्हता. त्यामुळं हे घडलं आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, संवाद कधी घडतो. कधी होत नाही. प्रत्येक पक्षात थोड कमी जास्त होत असतं. पण, ही जागा काँग्रेसकडं होती. तेव्हा संवादाचा प्रश्न नव्हता. तांबे हे सिटिंग आमदार होते. त्यामुळं ही जागा काँग्रेसचीच होती.

बोलणारे बोलत राहतात

औरंगाबादची जागा ही राष्ट्रवादीच्या काळे यांची होती. त्यामुळं ती जागा त्यांना दिली. बाळासाहेब थोरात यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो का, यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, बोलणारे बोलत राहतात. अमित देशमुख हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. त्यावर अशोक चव्हाण यांनी बोलणं टाळलं.