थेट प्रताप सरनाईकांना चॅलेंज, नाही बोलणार मराठी…कोण आहे हा?

नवी मुबंईतील एका अमराठी भाषिकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्याने जा आम्ही मराठी नाही बोलणार. रिक्षा चालवणार आणि पैसेही कमवणार, पण मराठी बोलणार नाही, असे थेट आव्हान परिवहन मंत्र्यांना केले आहे.

थेट प्रताप सरनाईकांना चॅलेंज, नाही बोलणार मराठी...कोण आहे हा?
sanjay dube
| Updated on: Aug 17, 2026 | 10:52 PM

एकीकडे अमराठी भाषिक रिक्षा चालकांना ग्राहकांशी मराठीत बोलण्यासाठी राज्य सरकारने सोप्या मराठी भाषेतील संवादाचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. तसेच या अमराठी रिक्षा चालकांची मराठी शिकण्याची मुदत उद्या ( १८ ऑगस्ट ) संपत असून कारवाई सुरु करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तर दुसरीकडे नवीमुंबईतील एका उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्याने आता थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच आव्हान दिले आहे.

अमराठी रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठीत बोलावे यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि  कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने सोपी मराठी कशी बोलावी याचा अमराठी भाषकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम सुरु केले आहेत. या प्रशिक्षण वर्गाला दीड लाखांहून अधिक अमराठी रिक्षा चालकांनी उपस्थिती दर्शवली असताना आता एका उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्याने थेट प्रताप सरनाईकांना आव्हान दिले आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुबंई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी हे आव्हान दिले आहे.

संजय दुबे म्हणतात की आजची पिढी तरुण आहे, प्रताप सरनाईक, आता कोणीही गुलामगिरी करणार नाही, हा भारत आहे, येथे आम्ही तुमचा प्रेमाच्या भाषेत आदर करू, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही धमक्या देऊन लोकांना गुलाम बनवाल तर लक्षात ठेवा की हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, सरकार लवकरच कोसळणार आहे असेही दुबे यांनी म्हटले आहे.  ते पुढे म्हणतात की प्रताप सरनाईक, तुमचे नशीबवान होता की तुम्ही परिवहन मंत्री मिळाले.  तुम्ही लोकांना गुलाम बनवाल, मी सुद्धा एक उत्तर भारतीय आहे, मलाही जबाबदारी देण्यात आली आहे, मी उत्तर भारतीय विकास सेना पक्षाचा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहे.  जर तुम्ही लोकांना गुलाम बनवले तर संजय दुबे कधीही मराठी बोलणार नाही, मी मराठी बांधवांचा आदर करतो आणि आमचे अनेक मित्रही मराठी आहेत, पण तुमच्या या राजेशाहीमध्ये संजय दुबे कधीही मराठी बोलणार नाही.

येथे पोस्ट वाचा –

७,७५० अमराठी रिक्षा चालक अनुत्तीर्ण

अमराठी भाषकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सुरु केले आहे. यात १ लाख ६५ हजार ६०० रिक्षा चालकांनी अर्ज केले होते. त्यात नवीमुंबईतून १४००, पालघर येथून ३५०, ठाणे येथून ४,८७१, मुंबईतून ९,१९६ आणि उर्वरित महाराष्ट्रात १,६१० अमराठी रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता.त्यात ७,७५० चालक अनुत्तीर्ण झाले तर १७,४२७ रिक्षा चालक उत्तीर्ण झाली होती. या अनुर्तीण रिक्षा चालकांसाठी पुन्हा उजळणी वर्ग होणार आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us