AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना डावलून बीडमध्ये मोठा पक्ष प्रवेश? नेमकं काय घडतंय?

आज बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्ष प्रवेश होत असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.

धनंजय मुंडेंना डावलून बीडमध्ये मोठा पक्ष प्रवेश? नेमकं काय घडतंय?
| Updated on: Aug 07, 2025 | 3:49 PM
Share

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा आज  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार आहे. मात्र माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्ष प्रवेश होत असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. बीडच्या वडवणी शहरात आज सायंकाळी साडेपाच वाजता राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे. मात्र पक्ष प्रवेशाच्या बॅनरवर कुठेही आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो किंवा नाव न छापण्यात आल्यानं  चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार की नाही? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार बीड दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे कालपासून बीड दौऱ्यावर आहेत. आज विविध विकास कामांची ते पाहणी करणार असून, दोन ठिकाणी मेळावे होणार आहेत. सर्वांचं लक्ष वडवणी शहरात होत असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र आणि 35 वर्षे सोबत राहिलेले बाबरी मुंडे यांच्या पक्षप्रवेशाकडे लागलं आहे. विशेष म्हणजे आमदार धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्ष प्रवेश होत आहे. कार्यक्रमाच्या बॅनर आणि पत्रिकेवर कुठेही त्यांचं नाव किंवा धनंजय मुंडेंचा फोटो लावण्यात आलेला नाहीये. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं काय म्हणाले बाबरी मुंडे?

यापूर्वी काय झालं? यापेक्षा यापुढे काय करायचं? हे ठरवून आम्ही पक्षात प्रवेश करत आहोत. आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत. आम्ही इतर कोणालाही निमंत्रण दिलेलं नाही. आमदार धनंजय मुंडे आले तर आम्ही, जो कोणी पदाधिकारी कार्यकर्ता असेल त्याचा प्रोटोकॉल प्रमाणे सत्कार करू. आमदार  धनंजय मुंडेंसोबत किंवा त्यांच्या कुठल्याही लोकांसोबत आमचं काहीही बोलणं झालेलं नाही, असं यावेळी बाबरी मुंडे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा