AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातसोबतचा व्हिडिओ समोर, बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपवर गंभीर आरोप

Ashok Kharat and bachchu Kadu : भोंदू बाबा अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर आता कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, यात त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

अशोक खरातसोबतचा व्हिडिओ समोर, बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपवर गंभीर आरोप
Kadu and KharatImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 24, 2026 | 4:38 PM
Share

महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दररोज त्याची कसून चौकशी केली जात आहे. अनेक राजकीय नेते अशोक खरातच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे नावही समाविष्ट झाले आहे. भोंदू बाबा अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात खरात बच्चू कडू यांना, ‘मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेंव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेंव्हा तुम्ही इथे या! असं म्हणत आहे. यावर आता बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी खरातचा निषेध करतो – कडू

बच्चू कडू म्हणाले की, भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो, आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते. त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठे असल्याने संस्कृती प्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो. आम्हाला माहित असतं की हे महाराज कामाचा नाही, पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो.

भाजपवर गंभीर आरोप

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, त्या महाराजांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा गेले, एकनाथ शिंदे ,विखे पाटील तिथे गेले पण तुम्ही मी त्यांना विचारलं का? कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या हे भाजपने ठरवलं आहे, इतर लोक गेले पण त्यांना विचार नाही बच्चू कडू गरीब आहे म्हणून तुम्ही विचारत आहे. बच्चू कडूंना बदनाम करण्याचा अजेंडा बीजेपी कार्यालयाकडून आला आहे.

मला बदनाम केलं जात आहे – कडू

बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, ‘त्या भोंदू बाबांनी जे सांगितलं त्यांचं पूर्ण विधान चुकीचं निघालं, मी त्यावेळेस उद्धव ठाकरें यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. खरात सोबतची माझी भेट अचानक झाली, कार्यकर्त्यांसोबत मी गेलो, त्या ठिकाणी माझा सत्कार झाला ती माझी चूक नाही, पण ते व्हिडिओ काढून मला बदनाम करण्याचं काम भाजपची टीम करत आहे.

भाजपचे नेतेही खरातला भेटले – बच्चू कडू

पुढे बच्चू कडू म्हणाले की, ‘आसाराम बापूच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गेले, भाजपचे मोठे चार नेते आसाराम बापू सोबत नसताना सुद्धा आहे, मग त्यांचा राजीनामा घ्यावा लागणार नाही का? ते झाकून ठेवायचं आणि इतर लोकांचा राजीनामा घ्यायचा, कोणासोबत कोणाचा फोटो असला म्हणजे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकणं चुकीचं आहे. दरम्यान, यावेळी बच्चू कडू यांनी अशोक खरात यांना जे जे भाजपचे नेते भेटले त्यांचे फोटो दाखवले. यात गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार