कामचुकार अधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतप्त; भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कडूंनी धरले धारेवर

| Updated on: May 27, 2022 | 7:06 PM

तसेच रमाई योजना, पंतप्रधान योजनेतून कोणतीही विकास कामे न केल्याने बच्चू कडू यांनी 8 दिवसात अहवाल मागवला आहे. दरम्यान कामात कसूर करणाऱ्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बच्चू कडू यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे.

कामचुकार अधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतप्त; भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कडूंनी धरले धारेवर
बच्चू कडू
Image Credit source: tv9
Follow us on

भुसावळ : अनेक वर्ष जनतेच्या कामांसाठी थेट सरकार आणि अधिकारी वर्गाला अंगावर घेणारे बच्चू कडू यांची महाराष्ट्रात (Maharashtra) डॅशिंग आमदार आणि आता राज्यमंत्री अशी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी वेगवेगळ्या विषयावर सरकारला धारेवर धरलं होतं. अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या स्टाईलने समज दिली होती. ज्यामुळे त्यांचे नाव सदा राज्यात चर्चेत राहते. आताही याच स्टाईलमुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी भुसावळ नगरपालिकेतील (Bhusawal Municipality) मुख्याधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केल्याचे समोर आले आहे. तर कडू (Minister of State for Education, Bachchu Kadu) यांच्या या अवतारामुळे अधिकाऱ्यांना मात्र घाम फुटला होता.

मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरत कानउघडणी

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे प्रशासकीय आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अ दर्जाच्या असलेल्या भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच त्यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. भुसावळ नगरपालिकेच्या वतीने रमाई योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत एकाही लाभार्थ्यांना अद्याप घर देण्यात आलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्याकडून दलितांवर अन्याय केला जात असल्याचे आरोप होत आहेत. असे असताना त्यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल का करू नये असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावरून केवळ रस्त्याची कामांचे प्राधान्य असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना रमाई योजना, पंतप्रधान योजनेचा विसर पडला आहे का असे म्हणत त्यांनी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरत कानउघडणी केली.

हे सुद्धा वाचा

8 दिवसात अहवाल मागवला

तसेच रमाई योजना, पंतप्रधान योजनेतून कोणतीही विकास कामे न केल्याने बच्चू कडू यांनी 8 दिवसात अहवाल मागवला आहे. दरम्यान कामात कसूर करणाऱ्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बच्चू कडू यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. दरम्यान कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बच्चू कडू चांगलेच संतप्त झाले होते.