AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश, उदय सामंत पत्र घेऊन आले, कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, अखेर आज सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. उदय सामंत यांच्या भेटीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश, उदय सामंत पत्र घेऊन आले, कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2025 | 2:49 PM
Share

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता, अखेर सातव्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यापूर्वी शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यांनी बच्चू कडू यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील, या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरही बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम होते? समिती कधी स्थापन करणार हे जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती.  त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली.  उदय सामंत हे पत्र घेऊन आले होते.

कर्जमाफीसंदर्भात येत्या  15 दिवसांच्या आता उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल. बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन मी आलो आहे. मी यासंदर्भात शुक्रवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. कर्जमाफीसाठी येत्या 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं.

दरम्यान यानंतर बच्चू कडू यांनी अखेर सातव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र उपोषण मागे घेतानाच त्यांनी आता कर्जमाफी संदर्भात सरकारला नवी डेडलाईन दिली आहे. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगावी अन्यथा मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  कर्जमाफीवर मौन धरलं होतं, पण आता ते कर्जमाफीवर बोलायला लागले आहेत. आपण कर्जमाफीच्या मागणीवर 90 टक्के यश मिळवलं आहे. दिव्यांगांच्या देखील 20 मागण्या आपण मान्य केल्या आहेत, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?