AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला हॉस्पिटमध्ये घेऊन चला… गर्भवती सूनेशी सासरच्यांची अमानूष वागणूक, नंतर जे काही झालं ते संतापजनक

गर्भवती सूनेसोबत सासरच्या माणसांनी कसं काही केलं, ज्यामुळे सर्वत्र संतापजनक वातावरण आहे... सून सतत म्हणत होती, मला हॉस्पिटमध्ये घेऊन चला..., पण नवऱ्याने देखील असं काही केलं जे फार धक्कादायक आहे...

मला हॉस्पिटमध्ये घेऊन चला... गर्भवती सूनेशी सासरच्यांची अमानूष वागणूक, नंतर जे काही झालं ते संतापजनक
| Updated on: May 11, 2026 | 12:25 PM
Share

सोनपावलांनी सून नाही लेक आणली… पण दुसऱ्याच्या लेकींना सासरी चांगली वागणूक मिळते का? यावर देखील लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण चार भिंतींमध्ये काय सुरु असतं कोणालाही माहिती नसतं… आता देखील असंच काही घडलं आहे. सासरच्या माणसांच्या अमानूष मारहाणीत गर्भवती महिलेचा गर्भपात झाला आहे. ज्यामुळे एका निष्पाप जीवाचा जन्माआधीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

ही धक्कादायक घटना, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पती, नणंद ,सासूविरुद्ध पथ्रोट स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सासरच्यां विरोधात गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी सतत मारहाण आणि छळ केल्याचे आरोप पीडित महिलेने केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी महिलेला बेदम मारलं, अशात ती गर्भवती असल्यामुळे, तिला त्रास सुरु झाला. पण मारहाण झाल्यानंतर महिला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला… असं सतत म्हणत होती.. पण तिचं कोणीच ऐकलं नाही… धक्कादायक गोष्ट म्हणजे नवऱ्याने देखील पीडित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यास नकार दिला…

आजच्या दिवसांत घडलेली ही एकच घटना नाही. बीडमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने स्वतःचं आयुष्य संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून मुस्कान वसीम शेख नामक विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती वसीम आयुब शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक छळामुळे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तर गेल्या वर्षी वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं होतं. पती, सासू, नणंद, सासरे यांच्या छळामुळे कंटाळून अवघ्या 23 वर्षांच्या वैष्णवीने 9 महिन्यांच्या लगहान मुलाला मागे सोडत आत्महत्या केली. अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत सर्वांना अटक केली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?