AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bala Nandgaonkar : दोनदा युतीचा प्रस्ताव घेऊन गेलात, आता तिसऱ्यांदा…बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया

Bala Nandgaonkar : मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य युतीच्या मुद्यावर बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याआधी ते दोनवेळा उद्धव ठाकरेकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेले होते. 'माणसाने कुठेही, कधीही नकारात्मक विचार करु नये, या मताचा मी आहे' असं ते म्हणाले.

Bala Nandgaonkar : दोनदा युतीचा प्रस्ताव घेऊन गेलात, आता तिसऱ्यांदा...बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया
Bala Nandgaonkar
| Updated on: Jun 07, 2025 | 12:23 PM
Share

मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य युती संदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना आज पत्रकारांनी गाठलं. बाळा नांदगावकर यांनी नेहमीच दोन्ही ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच समर्थन केलं आहे. “पक्ष प्रमुखांच्या अखत्यारितील विषय असल्यामुळे सद्य स्थितीत मी काही बोलण उचित वाटत नाही. माणसाने कुठेही, कधीही नकारात्मक विचार करु नये, या मताचा मी आहे. मी नेहमी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. निवडणुकीत पक्षाला, कार्यकर्त्यांना काय फायदा होईल, त्या दृष्टीने युतीचा विचार करावा लागतो. प्रत्येक पक्ष तसा विचार करतो” असं बाळा नांदगावकर म्हणाले.

तुम्ही उद्धव ठाकरेंकडे दोनदा युतीचा प्रस्ताव घेऊन गेला होता, आता तिसऱ्यांदा जाणार का? त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “यावर काही बोलणं उचित आहे, असं मला वाटत नाही. विषय वरिष्ठ स्तरावरचा आहे. मी वरिष्ठ नाही, छोटा कार्यकर्ता आहे. छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठासारखं बोलू नये, असं मला वाटतं” संजय राऊत बोलले की, भूतकाळातले विषय सोडून, भविष्याबद्दल विचार केला पाहिजे, “माझी आणि संजय राऊतांची अजून चर्चा झालेली नाही, जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला उत्तर देईन” असं बाळा नांदगावकर म्हणाले.

विषय माझ्या अखत्यारित नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल, यावर नांदगावकर म्हणाले की, “मला माहित नाही ते. सध्या या विषयावर कुठलं भाष्य करणं योग्य वाटत नाही. तुम्ही कितीही खोलात गेलात, तरी माझ्याकडून उत्तर मिळणार नाही” “युतीचा विषय माझ्या अखत्यारित नाही. माझ्या हातात विषय येईल, तेव्हा मी किंवा राजसाहेब तुम्हाला सांगतील” असं उत्तर बाळा नांदगावकरांनी दिलं.

संजय राऊत यांच्याशी मी मित्र म्हणून कधीही बोलू शकतो

“वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली, त्याची मला कल्पना नाही आणि असली तरी मी देणार नाही. जर-तरच्या गोष्टींवर बोलणं उचित नाही. संजय राऊत यांच्याशी मी मित्र म्हणून कधीही बोलू शकतो. पण पक्ष या विषयावर भाष्य करु शकत नाही” असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...