हॅप्पी बर्थ डे राधाकृष्ण विखे : बाळासाहेब थोरात

काँग्रेसला रामराम केलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं हाडवैर राज्याला सर्वश्रृत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे.

Balasaheb Thorat birthday wishesh to radhakrishna vikhe patil, हॅप्पी बर्थ डे राधाकृष्ण विखे : बाळासाहेब थोरात

शिर्डी : काँग्रेसला रामराम केलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं हाडवैर राज्याला सर्वश्रृत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानेही विखे-थोरात यांची टीका टिपण्णी पाहायला मिळाली. बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखेंना वाढिदविसाच्या शुभेच्छा दिल्या.

आमच्या कायमच त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा. त्यांनी आता काँग्रेसवर टीका करून काँग्रेसची काळजी करायला सुरुवात केली आहे. याची आता आवश्यकता नाही. त्यांची जबाबदारी आता बदलली आहे, असं  बाळासाहेब थोरात म्हणाले.

राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरातांनी मला शुभेच्छा दिल्या, चांगलंच आहे. त्यांचा मी आभारी आहे, असं राधाकृष्ण विखे म्हणाले.

साईचरणी लीन

दरम्यान, वाढदिवसानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतले. राज्यातील दुष्काळ दूर व्हावा, लवकर पाऊस पडावा आणी दुष्काळाची दाहकता कायमस्वरूपी दूर व्हावी, अशी पार्थना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.  साईबाबांचे आशीर्वाद घेऊन विखे पाटील मुंबईकडे रवाना.

मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिपद देणे किंवा शपथविधी याबाबत सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. केंद्रात जसा जनाधार मिळाला तसा राज्यातही मिळेल. मला जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडणार. मंत्रिपद कोणतं मिळावं याचा विचार कधीच केला नाही, असं राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

ही तर सुरुवात, अजून बरेच बॅनर लागायचे आहेत, विखेंचा थोरातांवर निशाणा   

शिर्डीत विखे-थोरात पुन्हा वाद, स्टार प्रचारकाचा फोटो हटवला  

पवार ते थोरात, विखेंच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे 

 विखेंनी जे मागितलं ते पक्षानं दिलं, मुलाला त्यांनी समजवायला हवं होतं : थोरात 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *