पवार ते थोरात, विखेंच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपुत्र सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडलं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, नगरमध्ये सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. विखेंच्या पत्रकार […]

पवार ते थोरात, विखेंच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपुत्र सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडलं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, नगरमध्ये सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

विखेंच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे :

  1. माध्यमांमधून जे काही सांगितलं जात आहे, मी ठरवलं होतं की सर्व प्रतिक्रिया आल्यानंतर आपली भूमिका मांडेन – राधाकृष्ण विखे पाटील
  2. शरद पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल जे विधान केलं, त्याने निश्चितच मला दु:ख झालं – राधाकृष्ण विखे पाटील
  3. शरद पवारांनी हयात नसलेल्या बाळासाहेब विखे पाटलांबद्दल वक्तव्य करणं चुकीचं – राधाकृष्ण विखे पाटील
  4. डॉ. सुजय विखेंनी जो निर्णय घेतला, तो त्याचा स्वत:चा निर्णय, विरोधी पक्षनेता म्हणून आघाडीला गालबोट लावण्याचा काम मी कधीही केलं नाही – राधाकृष्ण विखे पाटील
  5. लोकसभा निवडणुकीबाबत माझ्या मुलामुळे सर्व संघर्ष उभा राहिला हे म्हणणं चुकीचे आहे, काँग्रेस पक्ष म्हणून काही जागांची मागणी आम्ही केली. त्यात अहमदनगरची जागा होती – राधाकृष्ण विखे पाटील
  6. सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही, माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? – राधाकृष्ण विखे पाटील
  7. पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे, प्रचाराला जाऊन संशय नको, त्यामुळे नगरमध्ये मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
  8. बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत, त्यावर नंतर बोलेन – राधाकृष्ण विखे पाटील
  9. काँग्रेसशी माझी बांधिलकी, ते सांगतील ते मी करेन, तोच निर्णय मान्य – राधाकृष्ण विखे पाटील
  10. माझ्या मनात दुःख आहे आणि खंत पण आहे. पण राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून माझ्यावर जबाबदारी होती की, माझ्याकडून कुठेही चुकीचं विधान होऊ नये
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.