आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात दहा दिवस मांस विक्रीला बंदी

मोठी बातमी समोर येत आहे, आषाढी वारीनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात दहा दिवस मासं विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात दहा दिवस मांस विक्रीला बंदी
| Updated on: Jun 22, 2025 | 9:40 PM

पंढरपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे, आषाढी वारीनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रिचे दुकानं बंद असणार आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस मांस विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी यात्रेत पंढरपूर शहर व परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.  आषाढी यात्रेच्या आधी सात दिवस आणि नंतर तीन दिवस पंढरपूर शहर व पालखी मार्गावर मांस विक्रीला बंदी घालण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे.  यापूर्वी यात्रा कालावधीत फक्त तीन दिवस मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला जात होता, मात्र यावर्षी तब्बल दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भविष्यात पंढरपूर शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील मांस विक्रीचे दुकाने कायमचे बंद करून ठराविक जागीच मांस विक्री करण्याची परवानगी देणार असल्यांचही यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. यंदा दहा दिवस मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत.

वारकऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस मांस विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे. पूर्वी या कालावधीत फक्त तीन दिवस मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला जात होता, मात्र यावर्षी दहा दिवस शहर आणि परिसरात मांस विक्री बंद राहणार आहे, जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचं वारकऱ्यांनी स्वागत केलं आहे.

दरम्यान भविष्यात पंढरपूर शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील मांस विक्रीचे दुकाने कायमचे बंद करून ठराविक ठिकाणीच मांस विक्रीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी जयकुमार गोरे यांनी दिली आहे.