बंडातात्या कराडकर यांची प्रकृती खालावली, ‘या’ कारणामुळे पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल

बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार असून ते समाज प्रबोधनाचे कामही करतात.

बंडातात्या कराडकर यांची प्रकृती खालावली, 'या' कारणामुळे पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 2:53 PM

पुणेः वारकरी संप्रदायातील लोकप्रिय संत हभप बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांची प्रकृती अचानक खालावली. काल सकाळीच त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कालच सातारा (Satara) येथील फलटणमधील निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना पुण्यातील (Pune) रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सध्या बंडातात्या कराडकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

कालच १२ जानेवारी रोजी बंडातात्या यांना सकाळी त्रास जाणवू लागला. सातऱ्यातील फलटण येथील निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर वाढल्याची नोंद झाली.

डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे निदर्शास आले. कालपासूनच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.

आज पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आलं आहे. एमआरआय आणि अँजिग्रोग्राफी केल्यावर त्यांच्या मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत काही प्रमाणात ब्लॉकेज असल्याचे दिसून आले आहे.

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत

बंडातात्या कराडकर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या वाईन धोरणावरून त्यांनी अशाच प्रकारे वक्तव्य केलं होतं. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबाबत त्यांनी यासंदर्भाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तर कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी आषाढी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपुरात येण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार असून ते समाज प्रबोधनाचे कामही करतात. 1996 मध्ये त्यांनी व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ही संस्था काम करते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.