AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवार यांनी अखेर पाडले भाग, थेट अजित पवार विमान अपघात प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, राज्य..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. आता या प्रकरणात मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे.

रोहित पवार यांनी अखेर पाडले भाग, थेट अजित पवार विमान अपघात प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, राज्य..
Rohit Pawar and Ajit Pawar
| Updated on: Mar 25, 2026 | 12:02 PM
Share

28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीच्या दिशेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकही व्यक्ती वाचू शकली नाही, विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. अजित पवार यांच्या निधनाच्या चार दिवसांनंतर सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच पक्षाची धुराही त्यांनी आपल्याच हातात ठेवली. यादरम्यानच आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. हा अपघात की घातपात असाही सवाल त्यांनी केला. अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. आता रोहित पवार यांच्या तक्रारीवरून बंगळूर पोलिसांनी मोठ्या गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल करून तो पुढील तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवला आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटना इतरत्र कुठेही घडली असली तरी हा एफआयआर कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल केला जाऊ शकतो. राज्यातील पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास नकार दिला किंवा ते शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर आता रोहित पवार यांनी थेट बंगळूर मध्ये एफआयआर नोंदवली.

रोहित पवार यांनी आपल्या तक्रारीत दावा केला की, हा फक्त अपघात नसून काकांना (अजित पवार) संपवण्याचा हा एक हेतुपुरस्सर रचलेला कट असू शकतो. विमान संचालनातील गंभीर निष्काळजीपणा, सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि नोंदींमधील फेरफार यांमुळे हा अपघात घडला असाही आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही गंभीर आरोप केले जात आहेत. रोहित पवार यांनी विमान कंपनीवर आरोप केले, त्यांनी दिल्लीतील अनेक नेत्यांची भेटही घेतली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?