AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर, करुणा मुंडे-अभिजीत बिचुकलेंना नोटापेक्षाही कमी मतं, आकडा वाचून…

बारामती पोटनिवडणुकीच्या ताज्या अपडेटनुसार सुनेत्रा पवार यांनी ३६,३७७ मते मिळवून मोठी आघाडी घेतली आहे, तर करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले अजूनही पिछाडीवर आहेत.

बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर, करुणा मुंडे-अभिजीत बिचुकलेंना नोटापेक्षाही कमी मतं, आकडा वाचून...
karuna munde sunetra pawar abhijeet bichukale
| Updated on: May 04, 2026 | 11:27 AM
Share

राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अपेक्षेप्रमाणे मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारिकता उरल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ठरलेले अपक्ष उमेदवार करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.

सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व

सध्या बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीच्या फेऱ्या जशा पुढे सरकत आहेत, तशी सुनेत्रा पवारांची घोडदौड अधिक वेगवान झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या ४ फेऱ्यांत सुनेत्रा पवारांनी ३६ हजार ३७७ मतांचा टप्पा ओलांडला आहे. सुनेत्रा पवारांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत होत्या. पोस्टल मतदाननंतर ईव्हीएमच्या मतमोजणीतही त्यांनी मताधिक्य कायम राखत विरोधकांना कडवी टक्कर दिली आहे. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पुन्हा एकदा पवार नावाचाच करिश्मा चालल्याचे या आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांना किती मते?

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यांनी सोशल मीडिया आणि सभांमधून सुनेत्रा पवारांविरुद्ध मोठे रान उठवले होते. करुणा मुंडे यांनी महायुती आणि पवार कुटुंबावर गंभीर आरोप करत बारामतीमध्ये तळ ठोकणाऱ्या करुणा मुंडे यांना पहिल्या ४ फेऱ्यांत केवळ ६८ मते मिळाली आहेत. अद्याप त्यांच्या मतांमध्ये फारशी वाढ झालेली नाही.

तर दुसरीकडे मीच मुख्यमंत्री होणार असा दावा करणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना बारामतीकरांनी मोठा धक्का दिला आहे. ४ फेऱ्यांनंतर त्यांना केवळ ६५ मतं मिळाली आहेत. त्यांना साधे डिपॉझिट वाचवणेही आता अशक्य झाले आहे. अनेक मतदान केंद्रांवर या दोन्ही हायप्रोफाईल उमेदवारांना भोपळाही फोडता आलेला नाही.

निकालाचा कल काय सांगतो?

सध्याच्या कलानुसार, सुनेत्रा पवार यांना मिळालेली मते आणि इतर उमेदवारांची मते यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत नोटाला (NOTA) मिळालेली १५३ मते ही करुणा मुंडे आणि अभिजीतृ बिचुकले यांच्या मतांपेक्षा जास्त आहेत. आगामी फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवारांचे मताधिक्य लाखाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बारामतीचा हा गड त्या मोठ्या फरकाने सर करतील हे आता स्पष्ट झाले आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम