AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय

बारामती पोडनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून राज्यातील सर्वाधिक मताधिक्य घेणाच्या विक्रम केला आहे.

ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय
Sunetra PawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2026 | 2:30 PM
Share

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. केवळ विजयच नाही, तर सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे.

अजितदादांचाही रेकॉर्ड मोडीत!

बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आजच्या निकालात हा आकडा खूप मागे टाकला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल २,१८,९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

राहुरीतही भाजपचा गुलाल

बारामतीसोबतच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही समोर आला आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात होते. राहुरीच्या मतदारांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या मुलावर विश्वास दाखवत अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यात अक्षय कर्डिले यशस्वी ठरले असून, राहुरीमध्ये भाजपचा ‘कमळ’ पुन्हा एकदा जोमाने फुलले आहे.

नव्या पर्वाची सुरुवात

सुनेत्रा पवार यांच्या या विजयाने बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. २ लाखांहून अधिक मताधिक्य मिळवणे ही केवळ लाट नसून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली मोठी मोहोर आहे. या विजयानंतर बारामती आणि राहुरी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे. राज्यातील या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांच्या निकालांनी आगामी मुख्य विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित केला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी