खळबळजनक! रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; रात्री घराबाहेर पडली अन्
बारामतीत रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे.

पुण्यातील बारामतीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय. त्यांच्या मुलीची हत्या की आत्महत्या याविषयी कोणतीही समोर आलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांचं फॉरेन्सिक पथक बारामतीमधील रुई येथील साई गणेश नगर येथे पोहोचलं आहे. या घटनेनंतर रोहित पवारांनीही बारामतीत धाव घेतली आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे.
अजित दशावतारे यांचे मुलीचे आणि तिच्या आईचे रात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर ती घरातून बाहेर पडला. या प्रकरणी रात्री पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर सकाळी घराजवळच मृतदेह आढळून आला. ही मुलगी अवघ्या 12 वर्षांची होती. अजित दशावतारे यांच्या १२ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अद्यात मुलीचा नेमका कसा झाला, याचे कारण समजू शकलेले नाही. मिळाल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगी आणि आईमध्ये रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मुलगी रागाने घराबाहेर पडली. परंतु मुलीचा सकाळी मृतदेह आढळून आला. य घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनासास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचेही काम सुरू केले आहे. या मुलीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, हे तपासानंतर स्पष्ट होईल.
रोहित पवार बारामतीत दाखल होणार
अवघ्या 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थिती झाला, याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तिच्या मृत्यूमागे नेमकं वेगळे कारण आहे का, हेही तपाण्यात येणार आहे. ही सर्व माहिती तपासानंतर समोर येईल. परंतु अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने बारामतीत चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच रोहित पवार बारातमीत दाखल होत आहेत, अशी माहिती हाती आली आहे. आता बारामती पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद आणि रहस्यमय मृत्यूमागील कार समोर येण्याची शक्यता आहे.