बारामतीची सिद्धी पवार मोदींसोबत बसून चंद्रयान 2 चं लँडिंग पाहणार

मोदींसोबत बसून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदारी होण्याची संधी बारामतीच्या मुलीलाही (Siddhi Pawar baramati) मिळणार आहे. इस्रोच्या स्पर्धेत विजय मिळवत बारामतीच्या या मुलीने (Siddhi Pawar baramati) ही ऐतिहासिक संधी मिळवली आहे.

बारामतीची सिद्धी पवार मोदींसोबत बसून चंद्रयान 2 चं लँडिंग पाहणार
Follow us
| Updated on: Aug 31, 2019 | 6:42 PM

बारामती : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून लाँच करण्यात आलेलं चंद्रयान 2 लँड होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. चंद्रयान 2 चं लँडिंग स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही पाहणार आहेत. शिवाय मोदींसोबत बसून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदारी होण्याची संधी बारामतीच्या मुलीलाही (Siddhi Pawar baramati) मिळणार आहे. इस्रोच्या स्पर्धेत विजय मिळवत बारामतीच्या या मुलीने (Siddhi Pawar baramati) ही ऐतिहासिक संधी मिळवली आहे.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर शाळेची नववीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी विश्वंभर पवार हिने इस्रोने आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमात पाच मिनिटात अवघड प्रश्नांची उत्तरं दिली. तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय. तिच्या यशामुळे तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चंद्रयान 2 मोहिमेच्या लँडिंगचा अनुभव घेता येणार आहे.

इस्रोने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जागृती वाढवण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. यामध्ये अवघ्या पाचच मिनिटात 20 प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने सिद्धी पवारला 100 पैकी 100 गुण मिळाले. त्यामुळे सिद्धीला येत्या 7 सप्टेंबर रोजी इस्रोच्या बंगळुरु येथील नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बसून चंद्रयान 2 मोहिमेच्या लॅंडिंगचा अनुभव घेता येणार आहे.

सिद्धी पवार ही बालविकास मंदिर शाळेतील अतिशय हुशार विद्यार्थीनी आहे. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन तिने आतापर्यंत घवघवीत यश मिळवलंय. तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार आणि शाळेचे प्राचार्य, शिक्षकांनी अभिनंदन केलं. बारामतीत तिचे विविध स्तरातून कौतुक होऊ लागलंय.

लहानपणापासूनच शिक्षणात अतिशय हुशार असलेल्या सिद्धीने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय. इस्रोने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याचं समजल्यानंतर विश्वासच बसला नाही, असं सिद्धीची आई दिपाली पवार यांनी म्हटलंय. या यशानंतर आपला आनंद गगनात मावत नसल्याचं आणि पंतप्रधानांच्या उपस्थित होत असलेल्या कार्यक्रमाची उत्सुकता लागल्याचं दिपाली पवार सांगतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.