पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांसाठी तीन रुग्णालय, 50 बेड्स राखीव

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात (corona infected Pune Police) आला आहे.

पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांसाठी तीन रुग्णालय, 50 बेड्स राखीव
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 9:10 AM

पुणे : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात (corona infected Pune Police) आला आहे. या दरम्यान पोलिसांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. यासाठी पुण्यातील तीन रुग्णालयात कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहे. या रुग्णालयात 50 बेड्स पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी (corona infected Pune Police) दिली.

काही दिवसांपूर्वी एका कोरोना संशयित पोलिसावर उपचार करण्यासाठी एका रुग्णालयाने टाळाटाळ केली होती. त्यामुळे पुणे पोलिसांसाठी आता तीन रुग्णालयात 50 बेड्स राखीव ठेवण्यात येणार आहे. येथे कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जातील. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर, नायडू आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत.

कोरोनावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय पोलिसांसाठी स्थापन करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तांनी दिली होती. या रुग्णालयात फक्त कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.

लॉकडाऊन दरम्यान पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरुन लॉकडाऊन काठेकोरपणे पाळला जावा यासाठी काम करत आहेत. अशामध्ये आता पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 361 पोलीस कोरोनाबाधित असल्याचे समोर आलं आहे. याशिवाय डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यासारख्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच मुंबई पोलीस आयुक्तांनी 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालय, पोलीस आयुक्तांचा निर्णय

राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, 361 पोलिसांना कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.