AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडचे व्हिडीओ बघणाऱ्याला मारहाण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांची थेट कर्नाटकातून कारवाई

अशोक मोहितेला मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पथकं तयार करण्यात आली होती. अखेर काल रात्री उशिरा कर्नाटकमधून या दोघांना अटक करण्यात आली आहे.

वाल्मिक कराडचे व्हिडीओ बघणाऱ्याला मारहाण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांची थेट कर्नाटकातून कारवाई
ashok mohite accused
| Updated on: Feb 07, 2025 | 8:05 AM
Share

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडीओ बघितले म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. यात अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला आठ टाके पडले होते. अशोक मोहितेला मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पथकं तयार करण्यात आली होती. अखेर काल रात्री उशिरा कर्नाटकमधून या दोघांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीडच्या केज तालुक्याच्या करनळी गावात ही घटना घडली. अशोक मोहिते नावाचा तरुण हा खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडीओ पाहत होता. त्याचवेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन तरुणांच्या नजरेस अशोक मोहिते पडला. त्याने अशोकला वाल्मिक कराड याचे व्हिडीओ का पाहातो अशी विचारणा केली. यानंतर त्या दोघांनीही अशोक मोहितेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अशोकला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला मार लागला. डोळ्याला सूज आली. तसेच पाठीवरही मुका मार लागला. अशोक मोहितेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अशोक मोहितेला मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार असलेल्या कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे बोललं जात आहे. कृष्णा आंधळे याचा वाढदिवस होता. म्हणून त्याच्या मित्रांनी व्हॉट्सअॅपला कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटसला ठेवला होता. अशोक मोहितेला मारहाण केल्यानंतर हे दोघेही फरार झाले होते. याप्रकरणी धारुर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आली होती. अखेर आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

अशोक मोहितेंवर लातूरमध्ये उपचार सुरु

दरम्यान अशोक हे अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. ते धारुरच्या पोलीस स्टेशनमध्ये होमगार्डमध्ये नोकरीला करतात. या घटनेत त्यांच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. सध्या अशोक मोहितेंवर लातूरमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे अशोक मोहितेंना मारहाण करणाऱ्यांची चौकशी सुरु आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान