
लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एका मागून एक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. त्यांच्या मित्राने नर्तकी पूजा गायकवाड हिच्याबद्दल मोठा दावा केला. गोविंदला कला केंद्रात जाण्याची आवड होती आणि तिथेच पूजासोबत त्याची भेट झाली. पूजासोबत जवळीकता वाढत असल्याने गोविंद दररोजच कला केंद्रात जात होता. माजी उपसरपंच त्यामुळे राजकारणत वलय आणि सोबतच प्लॉटिंगचा व्यवसाय देखील गोविंदचा चांगला सुरू होता. मात्र, प्लॉटिंगच्या व्यवसायातून येणारा अधिक पैसा गोविंद हा फक्त पूजावर आणि तिच्या नातेवाईकांवर उडवत. दरम्यान त्याने त्याच्या मुलांचा गेवराईत मोठा बंगला देखील बांधला होता. आता पूजाला तो बंगला हवा होता.
पूजा बोलत नसल्याने गोविंद हा मानसिक तणावात होता. आत्महत्या करण्याच्या अगोदर गोविंदने पूजाला बरेच कॉल केले. ती फोन उचलत नसल्याने तो थेट तिचा घरी गेला. मात्र, तिथेही त्याचे समाधान झाले नाही आणि गोविंदने स्वत:वर गोळी झाडून घेतली. आता गोविंदच्या कुटुंबियांकडून आरोप केली जात आहेत. हेच नाही तर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्येही गंभीर बाबी दिसून आल्या.
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात लक्ष्मण चव्हाण यांनी फिर्याद दिलीये. या फिर्यादीमध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, तुळजाभवानी कला केंद्रात गोविंद बर्गे आणि नर्तकी पूजा गायकवाड यांची भेट झाली. त्यानंतर पूजा आणि गोविंद यांच्यातील जवळीकता इतकी जास्त वाढले की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, प्रेमसंबंध सुरू होऊन काही दिवसांमध्येच पूजाने गोविंदकडे पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली.
बुलेट गाडी, सोन्याची नाणी, दागिने, आयफोन, शेतजमीन, काही प्लॉट, पूजासोबतच तिच्या नातेवाईकांनी फुकटमध्ये गोविंदने प्लॉ दिली. गेवराईतील नवीन बंगला नावावर गोविंद करून देत नसल्याने तिने त्याला थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यासोबतच गोविंद बर्गेच्या कुटुंबियांनी अत्यंत मोठा संशय देखील व्यक्त केल्याचे बघायला मिळतंय. आता पूजा गायकवाड या नर्तकीच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.