AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराड महाराष्ट्रातच! CID लवकरच आवळणार मुसक्या

बीड हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून केली जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी बीड पोलीसही करत आहेत. त्यात आता वाल्मिक कराडबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराड महाराष्ट्रातच! CID लवकरच आवळणार मुसक्या
walmik karad santosh deshmukh
| Updated on: Dec 31, 2024 | 9:10 AM
Share

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. सध्या बीड हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून केली जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी बीड पोलीसही करत आहेत. त्यात आता वाल्मिक कराडबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराड हा महाराष्ट्राच असून सीआयडीचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे. आजपासून सीआयडीच्या आणखी ४ टीम वाल्मिक कराडचा शोध घेणार आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाल्मिक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली

तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून जप्ती सुरु झाली आहे. सीआयडीकडून या प्रकरण खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात वाल्मिक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली गेली आहे. त्यासोबतच वाल्मिक कराडची आणखी कोणत्या बँकेत खाती आहेत, याचाही शोध सुरु आहे. या जप्ती संदर्भातील पत्र सीआयडीकडून उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.

पत्नीची सीआयडीकडून चौकशी

तसेच बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) 9 पथके तयार केली आहेत. यात १५० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड नव्हे तर त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी सुरु होती.

वाल्मिक कराड कोण?

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप
  • मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय
  • गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे काम
  • धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर
  • परळीचे नगराध्यक्ष म्हणून काम केले.
  • 307 सारख्या गुन्हांमध्ये सहभागी असल्याचा आरोप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.