AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळपासून गायब, मोबाईल स्विच्ड ऑफ… घरात रडारड अन् धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’; मस्साजोगमध्ये काय घडतंय?

आता वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहेत. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून आंदोलन केले जात आहे. त्यातच आता संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख सकाळपासून गायब झाले आहेत.

सकाळपासून गायब, मोबाईल स्विच्ड ऑफ... घरात रडारड अन् धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून 'करो या मरो'; मस्साजोगमध्ये काय घडतंय?
Dhananjay Deshmukh beed
| Updated on: Jan 13, 2025 | 1:53 PM
Share

Beed Dhananjay Deshmukh Andolan : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. तरी अद्याप याप्रकरणातील एक आरोपी फरार आहे.  तर इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यातच आता संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आले. त्यातच आज मस्साजोगच्या आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले. त्यातच आज सकाळपासून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख गायब झाले होते. त्यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ होतो. त्यानंतर धनंजय देशमुख यांच्यासाठी गावकऱ्यांनी शोधकार्य सुरु केले. यानंतर त्यांच्या घरात रडारड सुरु झाली. काही वेळा पासून धनंजय देशमुख यांचा संपर्क होत नव्हता. ते कुठे गेले तेही कुटुंबाला माहिती नव्हते. त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ होता.

धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

यानतंर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती समोर आली. धनंजय देशमुख यांनी  भाऊ संतोष देशमुख याला न्याय मिळावा, यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’ आंदोलन सुरु केले आहे. धनंजय देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. यानंतर धनंजय देशमुख यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. “मी शांतपणे आंदोलन करतोय, मी न्याय मागतोय, पण माझा गैरफायदा घेतला जात आहे. मी न्यायाची भीक मागतोय”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार

“माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या चांगुलपणाचा किती फायदा घेणार. जर माझ्या चांगल्यापणाचा असा किती फायदा करुन घेणार आहात. मी शांतपणे आंदोलन करतोय, मी न्याय मागतोय, पण माझा गैरफायदा घेतला जात आहे. मी न्यायाची भीक मागतोय. पोलिसांनी माझी अजिबात चौकशी केली नाही. त्यांनी मला तुमचा कोणावर संशय आहे का, अशी चौकशी पोलिसांनी केली नाही. घटनाक्रम विचारला जात नाही. गाडी सापडली, चिठ्ठी सापडली याबद्दलही काहीही विचारले नाही. तपासाबद्दलही विचारलं जात नाही. मनोज दादांवरही केस टाकली जात आहे. न्याय मागताना केस दाखल केल्या जात असतील तर मी न्याय कशासाठी मागू”, असे धनंजय देशमुख म्हणाले.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...