चार लाखांचं 'पान', बीडचा दिलदार पानवाला!

महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही9 मराठी, बीड : चोरी-लूटमारीच्या घटनांची संख्या वाढत असताना, कुठे ना कुठे प्रामाणिक माणसंही जगाचं लक्ष वेधून घेतात. प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचा प्रत्यय बीडमध्ये नुकताच पाहावयास मिळाला. बीडच्या एका पानटपरीधारकाला तब्बल साडेचार लाख रुपयांची बॅग सापडली होती. मात्र कोणाची दिवाळी अंधारात नको म्हणून या पानटपरी चालकाने, पैशाने खचाखच भरलेली बॅग घेऊन पोलीस स्टेशन …

चार लाखांचं 'पान', बीडचा दिलदार पानवाला!

महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही9 मराठी, बीड : चोरी-लूटमारीच्या घटनांची संख्या वाढत असताना, कुठे ना कुठे प्रामाणिक माणसंही जगाचं लक्ष वेधून घेतात. प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचा प्रत्यय बीडमध्ये नुकताच पाहावयास मिळाला. बीडच्या एका पानटपरीधारकाला तब्बल साडेचार लाख रुपयांची बॅग सापडली होती. मात्र कोणाची दिवाळी अंधारात नको म्हणून या पानटपरी चालकाने, पैशाने खचाखच भरलेली बॅग घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांच्या मध्यस्थीने पैशाची ती बॅग संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोच करण्यात आली. पानटपरी चालकाचा हा प्रामाणिकपणा सध्या बीड शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

किशोर गुरुखुदे असं या दिलदार पानवाल्याचं नाव आहे. त्यांची बीडच्या बस स्थानक परिसरात पानटपरी आहे. चार दिवसांपूर्वी याच पानस्टॉलच्या शेजारी त्यांना एक बॅग मिळाली. त्या बॅगमध्ये तब्बल साडेतीन लाख रोख आणि एक लाख रुपयाचे बेरर चेक होते. ऐन दिवाळीत पैशाने सापडलेले खचाखच पैसे पाहून कोणाचेही मन आनंदाने फुलून जाईल. मात्र किशोर गुरखुदे या पानटपरी चालकाने ही पैशाची बॅग घेऊन चक्क बीडचे शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पैशाची बॅग पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.

कोणाची दिवाळी अंधारात जाऊ नये हा त्यांचा उद्देश होता. ऐन दिवाळीत पैशाची बॅग संबंधित व्यक्तीकडे पोहोचल्याने किशोरचा आनंद गगनात मावेनासा झाला.

पैशाची बॅग कुणाची?

किशोर यांना सापडलेली बॅग योगेश कोठेकर यांची होती. गावाकडील जमीन विकल्यानंतर त्याचे साडेचार लाख रुपये आले होते. त्यात साडेतीन लाख रोख आणि एक लाखाचे दोन चेक होते. मात्र सायंकाळी बीडच्या बस स्थानक परिसरात योगेशने पैशाची बॅग खाली ठेवली आणि फोनवर बोलत असताना त्याला बॅगचा विसर पडला. ती पैशाची बॅग तिथेच ठेवून तो निघून गेला.

तीन दिवसानंतर पैशाची तीच बॅग परत मिळाल्यानंतर कोठेकर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. पैशाची बॅग हरवल्याने कोठेकर कुटुंबाने दिवाळी साजरी केली नव्हती. मात्र आता पानटपरी चालक किशोर गुरुखुदे यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांची दिवाळी आनंदी झाली.

किशोर गुरखुदे यांच्या प्रामाणिकपणामुळे कोठेकर कुटुंबाची दिवाळी उत्साहात साजरी झाली. तर दुसरीकडे शिवाजीनगर पोलिसांनी किशोर यांचा सत्कार केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *