Beed : विद्यार्थीनीचा विनयभंग, मुख्यमंत्री फडणवीस यांची SIT ची घोषणा, राजकीय प्रत्यारोपाने वातावरण तापलं

दरम्यान या प्रकरणावरुन बीड जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. पिडीतेला न्याय देणं आवश्यक आहे.मात्र यामध्ये राजकारण घुसल्याच्या चर्चा सुरू आहे. यामुळे पिडीतेला खरोखरच न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Beed : विद्यार्थीनीचा विनयभंग, मुख्यमंत्री फडणवीस यांची SIT ची घोषणा, राजकीय प्रत्यारोपाने वातावरण तापलं
| Updated on: Jul 01, 2025 | 5:50 PM

बीडच्या नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी एका विद्यार्थीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळात उमटले आहेत. या संदर्भात विधीमंडळात राजकीय प्रत्यारोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे.या संदर्भात आमदार धनंजय मुंडे यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आणि आरोपी त्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत सोबत होते असा आरोप करीत त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बीडच्या  उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये जुलै 2024 ते 25 मे 2025 पर्यंत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. पिडीतेने शिवाजीनगर पोलिसात 26 जून 2025 रोजी दिली त्याच दिवशी तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे फरार झाले होते. यानंतर 28 जुन रोजी विजय पवारला आणि प्रशांत खाटोकर याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. 29 जुन रोजी बीड जिल्हा न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.यानंतर त्याच दिवशी सायंकाळी आमदार धनंजय मुंडे यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेत रात्री 8.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन आमदार क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत.

मस्साजोग प्रकरणात बोलणारे नेते आज गप्प का ?

आमदार संदीप क्षीरसागर हे गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रात्री 11 वाजता आरोपी सोबत होते, आरोपींना त्यांचे पाठबळ आहे का असा सनसनाटी आरोप धनजंय मुंडे यांनी केला आहे. स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे नेमके काय संबंध आहेत हे समोर येणं गरजेचं आहे त्यासाठी तपास व्हावा अशीही मागणी केली आहे. मस्साजोग प्रकरणात बोलणारे नेते आज गप्प का आहेत? त्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी आम्हाला लाज वाटली म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी बोललो होतो मात्र चौथ्या दिवशी बोलणाऱ्यांना लाज वाटली नाही का? असा आरोप केला. आमदार सुरेश धस म्हणाले आपण पीडित कुटुंबासोबत आहोत. कोणी आरोपीच्या बाजुने बोललंय का? असा सवाल धस यांनी केला आहे.

एसआयटी चौकशी

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सभागृहात आमदार चेतन तुपे यांनी काही प्रश्न उपस्थित करत योग्य दिशेने तपास करावा अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तयार करून या गुन्ह्याची चौकशी करू टाईम बाउंड पध्दतीने SIT चौकशी करेल आणि यामध्ये नराधमांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल असं जाहीर केलं आहे.

दीडशे दिवस गायब नव्हतो

आमदार संदीप क्षीरसागर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणातील एसआयटीच्या जी मागणीशी मी सहमत आहे, मी आमदार असलो आणि आरोपी माझ्याजवळचे असले तरी गुन्हा दाखल व्हायला दहा दिवस लागले नाही त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दीडशे दिवस गायब नव्हतो झालो कुठे ? मस्साजोग प्रकरणानंतर मंत्रीपद गेल्याने अजुनही त्याचं त्यांना दुःख आहे. मी सुद्धा या संदर्भात अजित दादा आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे कि यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. पीडित कुटुंबाची देखील भेट घेणार असल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

मंत्रिपद गेल्याचं दुःख आहे

लवकरच सत्य समोर येईल यामध्ये काय घडलंय ते? सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यांना या प्रकरणाचे दुःख वाटत नाही, त्यांचं मंत्रिपद गेल्याचं दुःख आहे असं क्षीरसागर म्हणाले.तर मी कुणावरही बदनाम करण्यासाठी चुकीचे आरोप केले नाहीत आणि पुराव्याशिवाय मी बोलत नाही असं आमदार धनंजय मुंडे म्हणाले. तर या प्रकरणात पळून जाण्यासाठी मदत केलेल्या अजय बचुरे याला अटक झाली आहे. आज दुपारनंतर न्यायालयासमोर या तीनही आरोपींना हजर केल्यानंतर पाच जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.