आरोग्य शिबिराला भेट दिली, त्यानंतर दोन्ही डॉक्टरांचा परतीचा प्रवास ठरला शेवटचा

कारचा वेग जास्त असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत होते. याचा अर्थ या वेगाने दोन डॉक्टरांचा बळी घेतला.

आरोग्य शिबिराला भेट दिली, त्यानंतर दोन्ही डॉक्टरांचा परतीचा प्रवास ठरला शेवटचा
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 3:24 PM

संभाजी मुंडे, प्रतिनिधी, अंबाजोगाई (बीड) : डॉक्टरांचं काम हे रुग्णांची सेवा करण्याचं असते. त्यासाठी बीड जिल्ह्यातल्या एका आरोग्य शिबिरास दोन डॉक्टरांनी भेट दिली. आरोग्य शिबीर सुरुळीत सुरू असल्याचं पाहून ते परत जात होते. तेवढ्यात समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या भरात त्यांच्या कारने हेलकावे खाल्ले. कार बाजूला घेत असताना अनियंत्रित झाली. यात दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कारचा वेग जास्त असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत होते. याचा अर्थ या वेगाने दोन डॉक्टरांचा बळी घेतला.

अशी आहेत डॉक्टरांची नावे

डॉक्टरांनी बीडच्या आडस येथील आरोग्य शिबिरास भेट दिली. त्यानंतर परत येताना भरधाव वेगातील गाडीला भीषण अपघात झाला. अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई येथील फिजिओथेरेफिस्ट डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी संतोष सातपुते असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

BEED 2 N

हे सुद्धा वाचा

समोरील वाहनाला चुकवताना कार झाडावर आदळली

आडस गावामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भेट देण्यासाठी हे दोघेही डॉक्टर तेथे गेले होते. शिबिराला भेट देऊन परत अंबाजोगाईकडे येत असताना गाडीचा भरधाव वेग होता. तेवढ्यात समोरून येणार्‍या वाहनाला चुकविताना गाडीने हेलकावा घेतला. रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात दोघांचा ही जागीच मृत्यू झाला.

तज्ज्ञ डॉक्टर गेल्याने मोठी हानी

डॉक्टर होण्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. अशा तज्ज्ञ डॉक्टरांची समाजात आवश्यकता आहे. हे स्कील प्राप्त करण्यासाठी बचार वेळ जातो. अशा तज्ज्ञ डॉक्टरांचा अपघाती मृत्यू होणे समाजाची मोठी हानी आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.