AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! एसआयटीची मागणी मान्य, वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी, कोर्टात काय-काय घडलं?

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी! एसआयटीची मागणी मान्य, वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी, कोर्टात काय-काय घडलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 15, 2025 | 5:13 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले. बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीसाठी 9 ते 10 ग्राउंडस मांडले. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला. वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसआयटी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?

  • संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर संभाषण झालं होतं. या तीनही आरोपींमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली.
  • संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झालं होतं, असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 मिनिटे या काळात वाल्मिक कराडचं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर वारंवार संभाषण झाल्याचा दाखला देत सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांची सीआयडी कोठडी मागितली.
  • आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि मग हत्या केली आहे. या गुन्ह्यातले आरोपी सराईत आहेत. त्यांची आधीही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहेत.
  • आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याला लपण्यासाठी आरोपींनी मदत केली आहे का? हे तपासायचे आहे. तीन आरोपींमध्ये १० मिनिटे नेमकं काय संभाषण झालं हे तपासायचं आहे.
  • वाल्मिक कराडच्या विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सुरू आहे.
  • आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये इंटरलिंक्स काय आहेत का? याचा तपास सुरू आहे. फार आरोपी अजून सापडायचे आहेत. कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहिती घ्यायची आहे. घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याची माहिती घेणं सुरू आहे
  • सरकारी वकिलांनी यावेळी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल का केला? याची देखील माहिती कोर्टात दिली. सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडवर याआधी दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची माहिती कोर्टात सादर केली आणि त्याच आधारावर वाल्मिक कराडवर मकोका म्हणजे संघटीत गुन्हेगारीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचं स्पष्ट केलं.

आरोपीच्या वकिलाने काय युक्तिवाद केला?

  1. कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही.
  2. वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही.
  3. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही.
  4. वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर आहे.

न्यायाधीशांकडून तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

फक्त फोन कॉलवर आरोपीला दोन्ही गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले आहे का? हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या बेसिसवर आरोपी बनवले आहे का? हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे याची खात्री केली होती का? असे प्रश्न न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारले.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ