संतोष देशमुख यांच्या बाजूने उभं राहणाऱ्यांना केलं जातंय टार्गेट, धनंजय देशमुख यांचा कुणावर निशाणा? तपासाबाबत म्हणाले काय?

Dhananjay Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात या दहा दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे त्यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी एक मोठा आरोप केला आहे.

संतोष देशमुख यांच्या बाजूने उभं राहणाऱ्यांना केलं जातंय टार्गेट, धनंजय देशमुख यांचा कुणावर निशाणा? तपासाबाबत म्हणाले काय?
धनंजय देशमुख
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 11:21 AM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात या दहा दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अगोदर रेंगाळलेला तपास, दबावाखाली असलेली पोलीस यंत्रणेने या दहा दिवसात जनरेट्यापुढे बरेच काम केल्याचे दिसून येते. प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे त्यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी एक मोठा आरोप केला आहे.

संतोष देशमुख यांच्या बाजूने उभे राहणारे टार्गेट

दरम्यान धनंजय देशमुख यांनी याप्रकरणात काही लोकांच्या भूमिकेवर उद्गिनता व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या बाजूने उभे राहिले त्यांना टार्गेट केलं जातं असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. न्याय मागताना कोण काय म्हणत आहे त्याच्याकडे ते पण लक्ष देत नाहीत, त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याला महत्त्व नाही. त्यांच्या विचाराशी ते काय म्हणतात त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संतोष अण्णा देशमुख यांची हत्या सराईत गुन्हेगारांनी केली आहे, माणूस म्हणून लोकप्रतिनिधी संघटना असतील ते न्यायाच्या भूमिकेत आहेत. आणि हे न्यायाच्या भूमिकेत कायम राहणार आहेत. त्यांनी काय विचार करावा त्यांच्या विचार करण्याची पद्धत असेल, त्यांनी वाल्मीक कराड समर्थकांचे नाव न घेता त्यांच्या भूमिकेवर अशी टीका केली.

जातीयवाद नाही, राज्याला योग्य मॅसेज गेला

याप्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या गावात बंजारा समाज आहे. आमच्या शेतीचे बटाईदार हे वंजारी समाजाचे आहे. ते गेल्या 22 वर्षांपासून आमचे बटाईदार आहेत. माझा दादा जे भांडण सोडवायला गेला होता ते दलित समाजाचे आहेत. इथं जातीवाद अजिबात नाही, आता तर सगळ्या राज्याला मॅसेज गेला आहे, सगळं गाव एका जागेवर राहत असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

ही गुन्हेगारी संपवा

पोलीस यंत्रणा, CID, SIT यांचं सगळ्यांचे काम चालू आहे. हे सर्व आरोपी संघटीत गुन्हेगार आहेत. ही सगळी गँग आहे. ही गुन्हेगारी मुळासकट उखडून टाका अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला.

तपास काय झाला ते आम्हाला अपडेट पाहिजे होतं, आम्ही डे वन पासून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री आणि यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आम्ही हे वेळोवेळी सांगतो त्याच्यातून ही गुन्हेगारी संपणार आहे ते संपणार आहेत आमची पण तीच मागणी आहे, असे ते म्हणाले. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील मोर्चात कुटुंबिय सहभागी होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....