प्रेम प्रेम सगळं खरंय हो, पण वेळीच पारखून घेणंही महत्त्वाचं आहे, ऐन व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला महिलेची दिल्ली ते बीड फरफट!

| Updated on: Feb 14, 2022 | 11:23 AM

नितीनच्या प्रेमापोटी संपूर्ण जग सोडून देणारी अनुराधा कदाचित ह्या पहिल्याच महिला नसाव्यात. जगात प्रेमाचे अनेख आदर्श दाखले आहेत. मात्र प्रेम करताना निरखून पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. हेच अनुराधा यांनी केलं असतं तर ही फरफट झालीच नसती.

प्रेम प्रेम सगळं खरंय हो, पण वेळीच पारखून घेणंही महत्त्वाचं आहे, ऐन व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला महिलेची दिल्ली ते बीड फरफट!
बीडमध्ये आलेल्या अनुराधा
Follow us on

बीड: आज व्हॅलेंटाइन दिवस (Valentine Day) आहे. संपूर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आजच्या दिवशी जगात प्रेम कहाण्यांचे दाखले दिले जातात. मात्र प्रेम करताना समोरील व्यक्ती पारखून घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. हे समजून घेण्यासाठी ऐन व्हॅलेंटाइन डे च्या पूर्वसंध्येला बीडमध्ये दिसलेल्या महिलेचं (Woman) उदाहरण बोलकं आहे. प्रेमात पडल्यानंतर या विवाहित महिलेने स्वतःच्या पतीशी घटस्फोट (Divorce) घेतला. बीडच्या एका व्यक्तीसोबत लग्न केले. चार वर्ष संसार झाला, पण अचानक हा प्रेमी नवरा सगळं सोडून बीडमध्ये पळून आला. त्याच्या शोधात आलेल्या या महिलेला बीडमध्ये मारहाणही झाली, तिला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय, ती वेळीच पारखून घेतली तर अशी फरपट झाली नसती, अशी भावना सदर महिलेनं व्यक्त केली आहे.

काय अनुराधाची व्यथा?

आज अनुराधा चव्हाण या डोक्याला हात लावून धाय मोकलून अश्रू ढाळत आहेत. मुळच्या मध्यप्रदेशातील वास्तव्यास असलेल्या अनुराधा ह्या पुण्यात रोजगारानिमित्त आल्या. तिथं बीडच्या नितीन चव्हाण या व्यक्तीची ओळख झाली. आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. आधीच विवाहित असलेल्या अनुराधा यांनी पहिल्या पतीसोबत रीतसर घटस्फोट घेऊन नितीन याच्याशी विवाह केला. दोघांच्या संसाराला चार वर्षे पूर्ण झाले होते. दोघेही दिल्लीत एका खासगी कंपनीत नौकरीला होते. मात्र बीडच्या नितीनने दिल्लीतून धूम ठोकत बीड गाठलं. त्याच पतीच्या शोधात अनुराधा बीडमध्ये आल्या. मात्र इथं आल्यानंतर अनुराधा यांना मारहाण झाली. जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. आज त्या शासकीय निवारागृहात सहारा घेतायत.

अनुराधा यांचा पती नितीन तव्हाण

पतीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी अनुराधा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नितीन चव्हाण याच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय. गुन्हा दाखल होताच नितीन फरार झाला आहे. प्रेमात धोका दिल्याने पीडिता पुरतीच हतबल झालीये. त्यामुळे बीडच्या शासकीय आधारगृहात तिचे समुपदेशन करण्यात येतेय. मात्र अनुराधा आज व्हॅलेंटाइन डे लाच एकाकी पडलीये. चार वर्षे प्रेमाच्या आणाभाका देणारा तिचा पतीच धोका देऊन पळून गेल्याने तिच्यावर मोठे संकट ओढवले आहे. प्रशासनाने तिच्या पतीचा शोध घेऊन अनुराधा यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा बीडच्या महिला सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. नितीनच्या प्रेमापोटी संपूर्ण जग सोडून देणारी अनुराधा कदाचित ह्या पहिल्याच महिला नसाव्यात. जगात प्रेमाचे अनेख आदर्श दाखले आहेत. मात्र प्रेम करताना निरखून पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. हेच अनुराधा यांनी केलं असतं तर ही फरफट झालीच नसती.

इतर बातम्या-

Astro tips for travel : मुसाफिर हू यारो म्हणतं प्रवासाला निघताय ? मग वास्तूशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवा नक्की फायदा होईल

तीन हजार रुपयांवरुन वाद, नातवाकडून आजोबांची हत्या, कुटुंबीय म्हणतात आईच्या दुसऱ्या लग्नाने मुलगा बिथरलेला