AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro tips for travel : मुसाफिर हू यारो म्हणतं प्रवासाला निघताय ? मग वास्तूशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवा नक्की फायदा होईल

आपल्या पैकी अनेकांना प्रवास (Travel), करायला आवडतो. प्रवासातील अनुभव आपल्याला आयुष्य (Life) जगण्यासाठी मदत करतात.

Astro tips for travel : मुसाफिर हू यारो म्हणतं प्रवासाला निघताय ? मग वास्तूशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवा नक्की फायदा होईल
travel
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 14, 2022 | 11:08 AM
Share

मुंबई : आपल्या पैकी अनेकांना प्रवास (Travel), करायला आवडतो. प्रवासातील अनुभव आपल्याला आयुष्य (Life) जगण्यासाठी मदत करतात. काहीवेळा आपले काम अगदी सहजतेने केले जाते, परंतु काही वेळा सर्व प्रयत्न करूनही आपण आपले ध्येय साध्य करू शकत नाही. हिंदू (Hindu) धर्मात ज्याप्रमाणे कोणतेही काम करण्यापूर्वी शुभ- अशुभ मानण्याची परंपरा आहे , त्याचप्रमाणे घरातून बाहेर पडताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणे करून तुमचा प्रवास सुखकर होईल. कोणताही प्रवास शुभ होण्यासाठी आणि कार्यात सिद्धी मिळवण्यासाठी नेहमी मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर जावे. सनातनच्या परंपरेनुसार आशीर्वादात खूप शक्ती असते, ज्याच्या शुभ प्रभावाने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात. अशा अनेक गोष्टी वास्तू शास्त्रात सांगितल्या आहेत चला तर मग  जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

या गोष्टी नक्की ट्राय करा

?️ ज्योतिषशास्त्रानुसार , आपण नेहमी एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजेच दिशा शूलच्या प्रवासाशी संबंधित दोषांचा विचार केला पाहिजे. सोप्या शब्दात कोणत्या दिशेला नुकसान किंवा अशुभ परिणाम मिळण्याची शक्यता असते त्यास दिशाशुल म्हणतात.

?️ सोमवार आणि शनिवारी पूर्व दिशा, गुरुवारी दक्षिण दिशा, मंगळवार आणि बुधवारी उत्तर दिशा आणि शुक्र आणि रविवारी पश्चिम दिशा शुभ मानली जाते. आठवड्याच्या या सात दिवसांत या दिशांशी संबंधित दोष लक्षात घेऊनच प्रवास करावा, अन्यथा तुमच्या विशिष्ट कामात अडथळा किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे.

?️ दिशाशी संबंधित दोषांबद्दल अशीही एक धारणा आहे की एखाद्या ठिकाणी एका दिवसात पोहोचणे आणि त्याच दिवशी परतणे निश्चित असल्यास दिशाशूल मानले जात नाही.

?️ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कामात यश मिळवण्यासाठी प्रवासाला जात असाल, तर निघताना नेहमी शुभ शब्द वापरून तुमची पावले पुढे टाका. कोणाशी वाद घालू नका आणि कोणाला शिवीगाळ करू नका.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Valentine’s Day | मैं अपनी फेवरेट हूं ! असंच म्हणाल, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी करुन स्वत:वर भरभरुन प्रेम करा

BeYourOwnValentine | मेरे लिए मैं काफी हू ! व्हॅलेंटाईन डे स्वतःला एकटं समजू नका , स्वत:वर भरभरुन प्रेम करा

14 February 2022 Panchang | 14 फेब्रुवारी 2022, व्हॅलेंटाईन डेचा दिवस कसा जाईल?, कोणाला होकार मिळणार, जाणून घ्या काय सांगतंय पंचांग

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान