Jyoti Mete: “पैशांची कारंजी कुठून?” विनायक मेटेंच्या मृत्यूला 4 वर्षे, ज्योती मेटे यांचा कुणावर संशय? थेट नाव घेत…

Jyoti Mete on Driver: गेल्या चार वर्षांपासून आम्ही या दुखातून जात असताना आरोपी त्याची लाईफ इन्जॉय करत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिवंगत विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी दिली. त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर जाहीर नाराजी बोलून दाखवली. त्यांनी यावेळी त्या चालकावर पुन्हा संशय व्यक्त केला.

Jyoti Mete: पैशांची कारंजी कुठून? विनायक मेटेंच्या मृत्यूला 4 वर्षे, ज्योती मेटे यांचा कुणावर संशय? थेट नाव घेत...
ज्योती मेटे, विनायक मेटे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 3:43 PM

दिवंगत विनायकराव मेटे यांची आज पुण्यतिथी आहे. रस्ते अपघातात 4 वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू ओढावला होता. हा अपघात की घातपात यावरून राज्यात मोठा खल झाला. याप्रकरणात अनेक शंकाकुशंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून आम्ही पाहत आहोत की, आरोपी न्यायपालिकेत अनुपस्थित राहतो. त्याच्याविरोधात चार्ज फ्रेम होत नाही. आम्ही कुटुंब म्हणून शिवसंग्राम पक्षातील कार्यकर्ते आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे आणि आरोपी त्याची लाईफ एन्जॉय करत आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी दिली. त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर जाहीर नाराजी व्यक्त केली.

मग आम्हाला संशय येणारच

दिवंगत विनायकराव मेटे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांना ज्योतीताई मेटे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. यादरम्यान बोलताना ज्योती मेटे यांनी अपघातानंतर आरोप असलेल्या चालकावर संशय व्यक्त केला आहे. तो विविध कार्यक्रम आयोजित करतो, सोशल माध्यमांवर पोस्ट सोडतो तर न्यायालयातही हजर राहत नाही यामुळे आजपर्यंत चार्ज फ्रेम (आरोप निश्चिती) होऊ शकलेली नाही. यामुळे आम्हाला संशय येतो असं डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी म्हटले. त्यांनी व्यक्त केलेल्या या संशयावरून उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

महागड्या शौकासाठी पैसा कुठून येतो?

आम्ही आमचा माणूस गमवला. आमचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. पण या प्रकरणाकडे सातत्याने कानाडोळा करण्यात येत आहे. संशयित चालकाच्या आर्थिक स्थितीबाबत डॉ. मेटे यांनी मोठा सवाल उपस्थित केला. या अपघातातील चालक आज सामाजिक जीवनात उजळ माथ्याने वावरत आहे. त्याच्याकडे आलिशान गाड्या आहेत. बैलगाडा शर्यतींसारख्या महागड्या शौकासाठी त्याच्याकडे पैसा येतो कुठून? असा सवाल करत त्यांनी या अपघात नसून घातपात असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. यामागील अदृश्य हातांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली. विनायकराव मेटे यांच्यानंतर महायुती सरकारमध्ये शिवसंग्राम पक्षाला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना कोणातही अपेक्षित राजकीय वाटा वा संधी मिळाली नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us