AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळाचं तोंडही पाहू देणार नाही, फडणवीसांनी सांगितला तो फॉर्म्युला

Devendra Fanavis in Jalna: जालना जिल्हा भाजप नूतन कार्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी मोठी घोषणा केली. त्यांनी पुढच्या पिढीला दुष्काळाचं तोंडही पाहू देणार नाही अशी हमी दिली. त्यासाठी मराठवाड्यात कुठून आणि कसे पाणी आणण्यात येईल हे ही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळाचं तोंडही पाहू देणार नाही, फडणवीसांनी सांगितला तो फॉर्म्युला
देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 3:13 PM
Share

आज जालना जिल्हा भाजप नूतन कार्यालयाचा भूमिपूजन तसेच शेतकरी भव्य मेळावा झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याची घोषणा केली. त्यांनी मराठवाडा कसा दुष्काळ मुक्त करणार हा फॉर्म्युलाही सांगितला. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे, ज्यावेळी एखादा व्यक्ती आपलं घर बांधतो तेव्हा कुटुंबाला आनंद होतो. तोच आनंद आज भाजपच्या कार्यकर्त्याला होत आहे. कार्यकर्त्याच्या हक्काचं घर आज तयार होत आहे. अतिशय चांगला भूखंड पक्षासाठी निवडला. आज भाजप देशातल्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. मोदींच्या नेतृत्वात आपला देश विकसीत होत आहे. 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा काम झालं. परिवर्तन करण्याच काम मोदीजींनी केलं, वेगवान जीवन आपण जगतोय. शिक्षणाची नवीन दालन उघडत आहे असे फडणवीस म्हणाले.

दुष्काळमुक्त मराठवाड्याची घोषणा

मराठवाड्याला नेहमीकरीता दुष्काळमुक्त करण्याचे काम आपण करत आहोत. एकीकडे कोल्हापूर, सांगलीचे पूराचे पाणी हे उजणीच्या धरणात आणणार आहोत. पश्चिम वाहिनी नद्यांचं 80 टीएमसी पाणी हे कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात आम्ही आणत आहोत. आमचा निर्धार आहे, या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळमुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू.

स्टील, सीड्स आणि आता सिल्क अशी जालन्याची ओळख

समृद्धी महामार्ग तयार करताना मी नेहमी सांगायचो की पुढचं महाराष्ट्राचं इंडस्ट्रीजच मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर आणि जालना आहे. आज ते आपल्याला खरं होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. कनेक्टिव्हिटी झाली आहे. ड्रायपोर्ट सुरू झाला आहे. आता तर आजच आम्ही जालन्याला सिल्क सिटी तयार करण्यासाठी पहिली बाजारपेठ सुरू केली आहे. आता जालन्याची ओळख 3S, ट्रिपल एस म्हणजे स्टील, सीड्स आणि सिल्क सिटी अशी होणार आहे. पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आरखडा आपण तयार केला आहे. येथील खासदार, आमदारांनी या सगळ्यांनी त्यासाठी कष्ट केले आहे. हा जिल्हा विकासाकडे अग्रेसर झाला आहे. जालना जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. हा जिल्हा भाजपवर प्रेम करणारा आहे. ज्यावेळी भाजपची सत्ता नव्हती. त्यावेळी सुद्धा हा जिल्हा पाठीशी राहिला. या जिल्ह्याने आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. म्हणून सर्वांच्या साक्षीने सांगतो की जालना जिल्ह्याच्या विकासात कोणताही कमतरता येऊ देणार नाही. तरुणाईच्या हाताला काम देण्यासाठी याठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

विविध योजनांची वाचली जंत्री

2014 पूर्वी अविकसित देश म्हणून ओळखलं जायचं त्याच देशाला आज सर्वात वेगवान आणि विकसित देश म्हणून मोदीजींच्या नेतृत्वात ओळखलं जाते. आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय केला. काँग्रेस सारखी लबाडी आम्ही केली नाही. आमच्या सरकारमध्ये शेतकर्‍यांना मोफत वीज मिळत राहिल. राज्यात 76 टक्के शेतकर्‍यांना दिवसा वीज देत आहे, लवकरच 100 टक्के शेतकर्‍यांना वीज देऊ. आपण सौर कृषी योजना राबविली लवकरच 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ आणि 12 तास देऊ. आता काही पोपट बोलायला लागलेत, मात्र त्यांना सांगतो 55 हजार शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल माफ करून त्यांना बेबाकी प्रमाणपत्र देणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी योजना घोषित केली तेव्हा भरभरून आपल्याला मत दिली. विरोधक बोलत होते कर्जमाफी देणार नही परंतू कोणतीही निवडणूक नसतांना आपण दिलेलं वचन पाळलं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम केलं. 2020 साली उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी दिली तेव्हा 2017 आधी मिळणार नही असं सांगितलं होतं. मात्र आता आम्ही सरसकट दिली, हे शेतकर्‍यांच सरकार आहे. लाडकी बहीण योजना काहीही झालं तरी बंद होणार नही, पैसे देत राहु. आता लखपती दीदी करायचं, 50 लाख लाडक्या बहिणी झाल्यात ते आता एक करोड करण्याचं उद्दिष्ट असल्याचे फडणवीस म्हणाले.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप